ETV Bharat / state

Nag River Revival Project : नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी ; पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट - प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केन्द्रीय मंत्रीमंडळाने नागपूर शहरातील नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला (Nag River Revival Project in Nagpur) मंजूरी दिली (Union Cabinet approves) आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 927 कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

Nag River Revival Project
नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
author img

By

Published : Dec 9, 2022, 10:42 AM IST

नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाउल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी प्रदान केली आहे. नागपूर महानगर पालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त (Union Cabinet approves Nag River Revival Project) केला.

नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

कोटींचा प्रकल्प : नाग नदी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 927 कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिका यांची भागीदारी असेल. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा 60 टक्के असेल तर राज्य सरकार 25 टक्के भार उचलणार आहे. नागपूर महानगरपालिकेला 15 टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून 1 हजार 115.22 कोटी, राज्य शासनाकडून 507.36 कोटी तसेच मनपाकडून १५ टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 131861 घरांना सीवर नेटवर्कमध्ये जोडण्यात (Nag River Revival Project in Nagpur) येईल.

अंमलबजावणीची जबाबदारी : नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प (Union Cabinet approves) आहे.

प्रकल्पातील प्रमुख मुद्दे : अंबाझरी तलावातून नाग नदी उगम पावते. नाग नदीची एकूण लांबी ६८ किमी आहे. शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नवे ‘एसटीपी’ (९२ एमएलडी) तयार करण्यात येतील. तर ‘एसटीपी’ (१० एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल. नविन 4 पम्पींग स्टेशन. प्रकल्पामध्ये १०७ ‘मॅनहोल’ वळण (मॅनहोल डायव्हर्सन) ४८.७८ किमी इंटरसेप्टर सीवर (नाग नदी व पिवळी नदी वर)उत्तर झोनमध्ये 247.9 किमी सीवर लाईन तसेच मध्य झोनमध्ये 211.60‍ किमी सीवर लाईन बदलण्यात येतील. प्रकल्प झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीचा पाण्याची गुणवत्ता सुधरेल. प्रकल्प वर्ष 5 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहराच्या स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल. नदयांच्या पाण्यात प्रदुषणाचे स्तर कमी (Nag River Nagpur) होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.