नागपूर - मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदिप झाडे यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मुंबई यांचे आदेशानंतर नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनाधिकृतपणे सुरू असलेल्या क्लिनकल लॅब सील करण्यात आली आहे. काटोलचे पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी नगर परिषद शॉपींग सेंटर मध्ये सर्रासपणे सुरू असलेली साई क्लीनिकल लॅबवर कारवाई केली आहे. साई क्लीनिकल लॅबचे संचालक मितेश कृष्णराव पोतदार असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल - पोलिसांनी महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कलम ३१(१), ३२ या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १७ मार्च २०२२ ला नागपुर जिल्ह्यांच्या काटोल येथील अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी आणि पॅरा वैद्यक व्यावसायीक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नासणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदिप झाडे यांना पत्र पाठवलेले होते. त्यानुसार संदिप झाडे यांनी काटोल पोलीस स्टेशन गाठुन पोलीस तशी तक्रार दाखल केली,त्यानंतर काटोल पोलिसांनी लेबॉरटरी सिल करुन साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईने बोगस लॅबधारक चांगलेच धास्तावले आहेत.