ETV Bharat / state

आनंद निरगुडेंच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 7:43 PM IST

Uddhav Thackeray On Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याने खळबळ (Anand Nirgude Resignation) उडाली आहे. यावर सत्ताधारी पक्षाने सौम्य भूमिका घेतली आहे. तर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरले आहे. अशात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

नागपूर Uddhav Thackeray On Nirgude Resignation : आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा (Anand Nirgude Resignation) दिला. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन आमदारांचा दबाव होता. त्यांच्या राजीनाम्यात काय दडलंय, हे पुढे यायला हवं. त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

भुजवळ पेढे आणि पटेलांकडे जेवायला जाणार : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आता भुजबळांकडे पेढा खायला तर प्रफुल पटेलांकडे कमी मिरची असलेले जेवण करायला जाणार आहे. ज्याप्रमाणे भुजबळांना जडीबुटी मिळाली त्याचप्रमाणे इतरांनाही मिळो.

नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्यांची चौकशी करा : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तसेच नगरविकासचे प्रभारी उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व महापालिकेच्या चौकशी करा, असं आव्हान दिलं. तसेच गणेशोत्सवादरम्यान नागपूरला पाण्यात बुडवणाऱ्या विकासपुरुषांची चौकशी करावी, सोबतच पीएम केअर फंडाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही : अयोध्येतील राम मंदिराला शिवसेनेचं समर्थन होतं. त्यासाठी आम्ही निधी दिला. प्रभू श्रीराम कुण्या एकाची मक्तेदारी नाही. त्यांचे नशिब आहे की ते सध्या सत्तेत असल्याने उद्घाटन करत आहेत. बाबरी पाडण्यात त्यांचा सहभागही नव्हता. मंदिरासाठी विशेष कायदा बनवा, असे मी सांगत होतो. नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि योगायोगाने मी मुख्यमंत्री झालो. मला कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही. मला जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण कमी पडले : बाळासाहेबांचे निधन २०१२ साली झाले. त्यानंतर दोन वर्षांनी अर्थात २०१४ मध्ये दीपक केसरकर शिवसेनेत आले. त्यावरून बाळासाहेबांचे नाव घेऊन सत्तेत येणाऱ्या शिंदे गटाचे पितळ उघडे पडले आहे, असे अनिल परब म्हणाले. याला पुष्टी देत उद्धव ठाकरे यांनी केसरकर जरी शालेय शिक्षणमंत्री असले तरी त्यांचे शिक्षण कमी पडल्याचा टोला लगावला.

हेही वाचा -

  1. कलम ३७०; न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, पण काश्मिरी पंडितांच्या सुक्षेची हमी गरजेची, पाकव्याप्त काश्मीरही परत आणा - उद्धव ठाकरे
  2. धारावीतील लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला
  3. आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.