ETV Bharat / state

नागपुरात २ एलआयसी एजंटचा झिलपी तलावात बुडून मृत्यू

झिलपी तलावात बुडून २ एलआयसी एजंट मित्रांचा मृत्यू झाला आहे.

मृत एलआयसी एजंट
author img

By

Published : Jul 13, 2019, 9:41 PM IST

नागपूर - शहरात फिरायला आलेल्या २ एलआयसी एजंट मित्रांचा मोहगाव येथील झिलपी तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या परिसरातील काही नागरिकांना तलावाच्या काठावर २ मोटारसायकली बेवारस आढळून आल्या आणि पाण्यावर प्रेत तरंगताना दिसले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. कमलेश रमेश शाहकार आणि देबोजित कल्याणजी बॅनर्जी, असे या मृतांची नावे आहेत. ते दोघेही मागील १० वर्षांपासून एलआयसीचे काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

तरुणांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेत नसताना

शुक्रवारी सकाळी ९ वाजता दोघेही आपापल्या मोटारसायकली घेऊन हिंगणा तालुक्यातील मोहगाव शिवारात असलेल्या झिलपी तलावावर पोहोचले. तिथे त्यांनी काही वेळ फोटो काढले. त्यानंतर ते घरच्यांशी मोबाईलवर बोलले,असल्याची माहिती मिळते. दुपारी २ वाजल्यानंतर मात्र, दोघांचे फोन बंद झाले. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या परिसरातील काही लोकांना त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यामुळे मोहगावचे सरपंचांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुंभारे आणि टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यांच्या कपड्यात सापडलेल्या ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटवली आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.

Intro:नागपूर शहरातून फिरायला आलेल्या दोन एलआयसी एजंट मित्रांचा मोहगाव (झिलपी)या बहुचर्चित तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.... या परिस्रातील काही नागरिकांना तलावाच्या काठावर दोन मोटारसायकली बेवारस आढळून आल्या व पाण्यावर प्रेत तरंगताना दिसले .तेव्हा ही घटना उघडकीस आली. कमलेश रमेश शाहकार आणि देबोजित कल्याणजी बॅनर्जी असे या दोन्ही मित्रांची नावे असून ते दोघेही मागील दहा वर्षांपासून एलआयसीचे काम करीत असल्याने चांगले मित्र होते.Body:शुक्रवारी सकाळी ९ वाजता दोघेही आपापल्या मोटारसायकली घेऊन हिंगणा तालुक्यातील मोहगाव शिवारात असलेल्या झिल्पि तलावावर पोहचले. तिथे काही वेळ त्यांनी घालविला. फोटो सुद्धा काढले...त्यानंतर ते घरच्यांशी मोबाईल वर बोलले असल्याची माहिती आहे....दुपारी दोन नंतर मात्र फोन बंद झाले. आज दुपारी दोनच्या वाजता या परिसरातील कांही लोकांना त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. मोटरसायकल काही अंतरावर उभ्या करण्यात आल्या होत्या. मोहगावचे सरपंचांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली .सहा पोलीस निरीक्षक नितीन कुंभारे आणि टीम घटनास्थळी दाखल झाले.... दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांच्या कपड्यात असलेल्या ओळखपत्र वरून ओळख पटविण्यात आली व नातेवाईकांना सूचना देण्यात आली आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.