नागपूर - नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यांर्तगत असलेल्या केडीके कॉलेजजवळ एका २५ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या मित्रानेच हा हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
मैत्रिणीच्या घरी जातांना असताना हल्ला -
तरूणी ही एका खासगी रुग्णालयात परिचरिका म्हणून काम करते. ती आपली ड्युटी संपवून ती मैत्रिणीकडे जात असताना तिच्या प्रशांत नावाच्या एका मित्राने तिला वाटेत गाठून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रशांतला अटक केली आहे.
मोनिका किराणापुरे हत्याकांडांची पुनरावृत्ती टळली -
11 मार्च 2011 रोजी नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या मोनिकाचा कुणाल नावाच्या तरुणाने चाकूने हल्ला करत तिचा खून केला होता. हे प्रकरण त्याकाळी फार गाजले होते. त्याचप्रमाणे आज देखील आरोपीने पीडितेवर चाकूने हल्ला करून तरुणीला गंभीर जखमी केले आहे. सुदैवाने पीडिता तरुणीला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तीच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
हेही वाचा - महापुरुषाचा समाज माध्यमात अवमान; नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक