ETV Bharat / state

Nagpur Travels Accident : पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली; ५ प्रवासी जखमी - पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली

नागपूर जिल्ह्यातील हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात एक खासगी ट्रॅव्हल Travels plunged into deep ravine Pendhari Ghat बस खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये ३० प्रवासी असून त्यापैकी ५ प्रवासी जखमी झाले आहेत.

Nagpur Travels Accident
पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली
author img

By

Published : Sep 16, 2022, 12:20 PM IST

Updated : Sep 16, 2022, 2:23 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात एक खासगी ट्रॅव्हल Travels plunged into deep ravine Pendhari Ghat बस खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये ३० प्रवासी असून त्यापैकी ५ प्रवासी जखमी झाले आहेत. नागपूरकडून हिंगणी मार्गे वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स २० फूट खोल दरीत कोसळली आहे. पेंढरी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं बोललं जातं आहे.

पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली

हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात खासगी ट्रॅव्हल्स बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात घडला (Nagpur Bus Accident) आहे. या अपघातात बसमध्ये प्रवास करत असलेले १० प्रवाशी जखमी झाले असून ५ प्रवाशी गंभीर असल्याने त्यांना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर आणि कामठी येथील ३५ जण आज पिकनिककरिता वर्धा जिल्ह्यातील बोरधरण आणि पवनार येथील विनोबा भावे आश्रमत जाण्यासाठी निघाले होते. त्यासाठी हिंगणा मार्गे बस निघाली होती. बस पेंढरी घाटातून जाताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती समजताच स्थनिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिंगणा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जखमी रुग्णालयात दाखल:-पिकनिकसाठी एकूण बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यापैकी १० प्रवासी जखमी झाले असून, पाच प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.