ETV Bharat / state

खुशखबर.. पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन

author img

By

Published : Dec 2, 2020, 10:02 PM IST

जंगल सफारीची हौस असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. वाघांसह काळा बिबट देखील पेंचमध्ये आढळून आल्याने पेंच हे पर्यटकांच्या आकार्षणाचे केंद्र ठरत आहे.

black leopard in Pench Tiger Reserve
पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन

नागपूर - जंगल सफारीची हौस असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. गेल्या महिन्यातच पेंचमध्ये काळ्या बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. त्यावेळी बिबट अवघ्या काही सेकंदासाठी ओझरता दिसला होता. मात्र, यावेळेस पर्यटकांनी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये बिबट स्पष्ट दिसत आहे.

काळा बिबट

विशेष म्हणजे, यावेळी त्याच्यासोबत अजून एक बिबट (सामान्य पिवळ्या काळ्या ठिपक्यांचा) दिसून आला. दोन दिवसापूर्वी पेंचच्या मध्यप्रदेशातील तुरिटा गेटजवळ पर्यटकांना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. तुरिटा गेटमधून गेलेल्या काही पर्यटकांना हा काळा बिबट दिसला होता. अचानक काळा बिबट दिसल्याने सर्वच पर्यटक आश्चर्यचकित झाले होते.

ताडोबामध्येही दिसला होता काळा बिबट्या

विशेष म्हणजे, वाघाचे सुरक्षित अधिवास म्हणून ओळखल्या जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा येथेसुद्धा काळा बिबट दिसला होता. त्यानंतर त्याला पाहाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक प्रकल्पात आले होते. आता वाघांसह काळा बिबट देखील पेंचमध्ये आढळून आल्याने पेंच हे पर्यटकांच्या आकार्षणाचे केंद्र ठरत आहे.

हेही वाचा - नागपूर : सायलक स्वारी करून मनपा कर्मचाऱ्यांनी पाळला 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.