नागपूर - सत्तासंघर्षाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेनेला सुबुद्धी मिळावी आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घ्यावी, यासाठी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून होम-हवनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देव शिवसेनेला सुबुद्धी देवो आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी नागपुरातील कल्याणेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून होम-हवन करण्यात आले. भाजपचे नगरसेवक भुषण शिंगणे यांच्या नेतृत्त्वात काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही पूजा केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी फडणवीस यांच्या एका चाहत्याने दोन किलोमीटर अंतर कापून प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरापर्यंत दंडवत घालत बाप्पाला साकडे घातले होते.