नागपूर - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी आणि सावरकरांच्या विषयावरून सलग २ दिवस विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आज विधानसभेचे कामकाज ११ वाजता सुरू झाले असून अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनिती निश्चित केली जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी देखील विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे.
- 6.49 PM : महाविकास आघाडीने लोकशाही दाखवून दिली - आदित्य ठाकरे
- 06.28 PM : महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - रवी राणा
- 05.10 PM : नितीन आगेच्या हत्याकांडातील आरोपी निर्दोष का सुटले? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- 05.01 PM : जन्म दाखले, रहिवासी दाखले लवकरात लवकर द्यावेत - जितेंद्र आव्हाड
- 05.01 PM : हवालदारांचे प्रश्न सोडवण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी
- 04.56 PM : महापोर्टल रद्द करा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मागणी - जितेंद्र आव्हाड
- 04.53 PM : माजी जन्मठेप शिकवाच, पण त्यांचा सर्व इतिहास शिकवावा - जितेंद्र आव्हाड
- 04.50 PM : फडणवीस म्हणतील तेच खरे, जितेंद्र आव्हाडांचा मिश्कील टोला
- 04.39 PM : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली नाही - चंद्रकांत पाटील
- 04.32 PM : सरकारने मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवावे - चंद्रकांत पाटील
- 04.26 PM - माजी शिक्षणमंत्र्यांवरील घोटाळ्यांच्या आरोपांचे काय झाले? जलयुक्त शिवार घोटाळ्याचे काय झाले? - पृथ्वीराज चव्हाण
- 04.20 PM : गेल्या 5 वर्षात किती उद्योग सुरू झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
- 04.19 PM : गेली पाच वर्षे वाया गेली, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नाही, आंबेडकरांचे स्मारक नाही, गेल्या सरकारने 5 वर्षे वाया घालवली.
- 04.19 PM : गेल्या सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही - पृथ्वीराज चव्हाण
- 04.19 PM : परकीय गुंतवणूक भारतात आली आहे, असे विरोधीपक्ष नेते सांगत आहेत. तर भारतात किती कारखाने सुरू झाले आहेत, याचे उत्तर विरोधीपक्ष नेत्यांनी द्यावे - पृथ्वीराज चव्हाण
- 4.14 PM : कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे आमच्यासमोर आव्हान - पृथ्वीराज चव्हाण
- 2.20 - मी परत येणार असे म्हटले होते. जनतेने परत पाठवले होते. हेराफेरीमुळे विरोधात बसण्याची वेळ आली आहे - फडणवीस
- 2.18 - आम्ही आता विरोधी पक्षात आहोत. किती दिवस राहावे लागणार हे नियती ठरवेल : फडणवीस
- 2.14 - काही लोकांना सावरकरांचे नाव घेतल्यानंतर विंचू का चावतो हे मला कळत नाही. सावरकरांबद्दल चांगले बोलले पाहिजे. सर्व महापुरुषांना सन्मान दिलाच पाहिजे - फडणवीस
- 2.06 - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा त्रिशुळ सेनेकडे होता. त्यांना अशा कुबड्यांची गरज नव्हती - फडणवीस
- 2.05 - या सरकारमुळे त्रिशंकू शब्दाचा वेगळा अर्थ निघाला. आता त्रिशंकू म्हणजे तीन पक्षावर शंका घेणारे पक्ष असा झाला - फडणवीस
- 2.04 - भारुडानं फडणवीस यांनी महा विकासआघाडीच्या 3 चाकाच्या सरकरवर टीका केली
- 2.01 - धनगर समाजाच्या कल्याणासाठी भाजप सरकारने जाहीर केलेल्या हजारो कोटींच्या योजना समाजाला लागू होणार आहेत का? त्यांना ही स्थगिती मिळणार आहे हे मला मुख्यमंत्र्यांनी उत्तरात आम्हाला सांगावे - फडणवीस
- 1.58 - मराठा आरक्षणाचा प्रश्न 40 वर्षे प्रलंबित होता, आम्ही आरक्षण लागू केले - फडणवीस
- 1.56 - मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या कामांची स्थगिती मागे घ्या - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
- 1.20 - शरद पवारांवर केलेली सर्व वक्तव्ये सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकली: नाना पटोले
- 1.19 - विधानसभेत गदारोळ, महाविकास आघाडाचे सदस्य आक्रमक
- 1.18 - शरद पवार सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल याठिकाणी बोलू नये - भास्कर जाधव
- 1.17 - शरद पवार विषय केलेले वक्तव्य सभागृहाच्या कामकाजात काढून टाका - धनंजय मुंडे
- 1.24 - फडणवीस यांनी सांगितले होते, की मी सामना वाचत नाही. मग आता का सामना वाचता? - गुलाबराव पाटील
- 1.10 - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिला होता का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला
- 12.47 - नागपूरच्या माणसाने नागपुरातील जनतेशी बेईमानी केली.
- 12.11 - सभागृहाच्या कामकाजातील असंविधानिक शब्द कामकाजातून वगळले जातील - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
- 11.59 - सभागृहाचे कामकाज पुन्हा १० मिनिटांसाठी तहकूब
- दु. 11.58 - सभागृहाचे कामकाज सुरू
- 11.48 - गदारोळ वाढल्याने विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब
- 11.45 - भाजप आमदारांची सभागृहात घोषणाबाजी
- 11.46 - कायद्यावर कोणत्याही सभागृहात चर्चा होऊ शकते. संविधानिक अधिकार आहे. मी वंजारी जातीचा असून तांड्यावर माझ्या समाजातील लोकांचा जन्म होतो.त्या समाजातील लोकांची कुठेही नोंद होत नाही.त्यामुळे अनेक गरीब आणि श्रीमंत असा भेद करणारा कायदा आहे - आमदार जितेंद्र आव्हाड
- 11.45 - नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राज्यात आणि देशात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात निदर्शन होत आहेत. त्यामुळे राज्यात या कायद्याची अंमलबजावणी होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे: अशोक चव्हाण
- 11.43 - संसदेने मंजूर केलेल्या कायद्याला आव्हान देण्यात आलेल्या तोपर्यंत राज्यात अंमलबजावणी होऊ नये. अशी अपेक्षा आहे यामध्ये गैरसमज काही नाही - पृथ्वीराज चव्हाण
- 11.41 - संविधानाने दिलेल्या अधिकाराने संसदेने मंजूर केलेला कायदा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
- 11.49 - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
- 11.37 - 11.37 - सभागृहातील प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार आहे. सर्वजण निवडून आलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी अधिक संयमी असायला हवे. मी नेहमी अंगावर धावून जायचो.परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मी स्वतःला सावरत राहण्याचा प्रयत्न करतो : विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस
- 11.29 - आमदारांच्या सुरक्षेवर आमदारांचा विधानसभेत त्रागा : मद्यधुंद अवस्थेत आमदारांना रात्री त्रास दिला जात असल्याचा आक्षेप
- 11.17 - प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवर बसून बोलले पाहिजे : अजित पवार
- 11.12 - स्थगन प्रस्तावावर योग्यवेळी निर्णय घेऊ : पटोले
- 11.09 - नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 57 प्रस्ताव दाखल केला.
- स. 11.03 - विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब
- स. 11.02 - अभद्र सरकार जन्माला आले आहे. सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही : सुधीर मुनगंटीवार
- स. 11.01 - मंत्री सभागृहात नसल्याने विरोधकांचा गदारोळ
विधिमंडळ आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची चिंतन बैठक अध्यक्ष शरद पवारांसोबत मंगळवारी पार पडली. त्यानंतर आज भाजप आमदारांची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेत पार पडणार आहे.
हे वाचलं का? - खडसेंनी पवरांची भेट घेतली, पक्षांतराबद्दल अजून भूमिका अस्पष्ट - नवाब मलिक
आज विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना आणि राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. मात्र, मंगळवारी सभागृहात झालेल्या हमरी-तुमरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ सद्स्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. आजही शेतकरी मदतीवरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे, तर सत्ताधारी पक्षही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.