ETV Bharat / state

सीसीटीव्ही : 'कॅमोऱ्या'ची दिशा बदलून केली चोरी, दुसऱ्या 'कॅमेऱ्या'त झाले चोरटे कैद

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराफ दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरट्यांनी दुकानात चोरी केली. पण, दुकानातील कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले

सीसीटीव्हीत कैद चोरटे
सीसीटीव्हीत कैद चोरटे
author img

By

Published : Jan 19, 2020, 5:35 PM IST

नागपूर - शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा नगर येथील एका सराफ घुसून चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ केला. चोरी करण्यापूर्वी आरोपींनी सीसीटीव्हीची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते दोन्ही चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही व माहिती देताना पोलीस अधिकारी

नागपूरच्या हडकेश्वर भागातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत शारदा नगरमध्ये दिलीप केशवराव बांगारे यांच्या मालकीचे गुरु माऊली नामक सोनाराच दुकान आहे. या दुकानाचे शटर दोन अज्ञात चोरट्याने उचकटले होते. दुकानाचे शटर उचकटण्यापूर्वी दोन्ही चोरट्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी आपण सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तेथून पळून जाण्याऐवजी सीसीटीव्हीची दिशा वळवली. यानंतर चोरट्यानी दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेले नगदी 50 हजार रुपये आणि 4 लाख 43 हजार 302 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा -

Intro:नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या शारदा नगर येथील एका सराफा घुसून चोरत्यांनी लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ केला...चोरी करण्यापूर्वी आरोपींनि सीसीटीव्ही ची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते दोन्ही चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत,त्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे

Body:नागपूरच्या हडकेश्र्वर भागातील हुडकेश्र्वर पोलिस स्टेशन अंतर्गत शारदा नगर मध्ये दिलीप केशवराव बांगारे यांच्या मालकीचे गुरु माऊली नामक सोनाराच दुकानं आहे... या दुकानाचे शटर दोन अज्ञात चोरट्याने तोडले होते...दुकानाचे शटर तोडण्यापूर्वी दोन्ही चोरट्याने स्वतःच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून दुकानाच्या आत प्रवेश केला...त्यावेळी आपण सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी तिथून पळून जाण्याऐवजी सीसीटीव्हीची दिशा वळवली,यानंतर चोरट्यानी दुकानाच्या गल्यात ठेवलेले नगदी ५० हजार रुपये आणि ४,४३,३०२ रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने लंपास केले आहेत...या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे

Byte - पोलीस अधिकारीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.