ETV Bharat / state

फास्टटॅग लावण्यासाठी आता मुदतवाढ मिळणार नाही - गडकरी - Fast tag news update

टोल नाक्यावर लोकांच्या रांगा न लागता सिमलेस ट्राफिक राहावे, कुठेही थांबण्याची गरज पडू नये यासाठी वाहनावर फास्टटॅग लावून घ्यावे. टोल नाक्याच्या बाजूला फास्टटॅग लावण्याची व्यवस्था केली आहे, ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

फास्टटॅग लावण्यासाठी मुदतवाढ नाही
फास्टटॅग लावण्यासाठी मुदतवाढ नाही
author img

By

Published : Feb 14, 2021, 8:22 PM IST

नागपूर - टोल नाक्यावर लोकांच्या रांगा न लागता सिमलेस ट्राफिक राहावे, कुठेही थांबण्याची गरज पडू नये यासाठी वाहनावर फास्टटॅग लावून घ्यावे. टोल नाक्याच्या बाजूला फास्टटॅग लावण्याची व्यवस्था केली आहे, ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

अनेक मार्गावर 70 ते 80 टक्के वाहनधारकांनी फास्टटॅग वाहनावर लावून घेतले आहे. काही मार्गावर हे प्रमाण 90 टक्के आहे. आता केवळ 10 टक्के लोक राहिले आहे. दोन तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता पुन्हा मुदतवाढ देणार नाही. त्यामुळे राहिलेल्या वाहनधारकांनी लवकरात लवकर फस्टटॅग लावून घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

वेगवेगळ्या माध्यमातून तयार केला जातो सीएनजी

वेगवेगळ्या माध्यमातून सीएनजी तयार होतो, धानाचे तनस, पराट्या, तुराट्या, ज्वारीचे व सोयाबीनचे कुटार यापासून सीएनजी मिळतो. तसेच साखर कारखाण्यात तयार होणाऱ्या मिथेनपासून देखील 18 टन सीएनजीची निर्मिती होते. सीएनजी मिळवण्याचा तीसरा पर्याय म्हणजे ऑरगॅनिक वेस्ट यापासून मिथेनची निर्मिती केली जाते आणि त्यापासून सीएनजीची निर्मिती केली जाते.

पूर्व विदर्भात पेट्रोल डिझेल विरहीत वाहने धावणार

पूर्व विदर्भात पेट्रोल डिझेलमुक्त वाहने धावणार आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांमध्ये येत्या पाच वर्षांत सर्व वाहने हे पेट्रोल-डिझेलमुक्त करत सीएनजीमध्ये रुपांतरीत करायचे आहेत. यासाठी नागपुरातील कामठी रोडवर काम सुरू झाले आहे. महानगर पालिकेतील 400 बसेस या सीएनजीवर चालवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी गडकरी यांनी दिली.

सीएनजीवर वाहने चालल्यास वर्षाला लाखोंची बचत होणार

एक लिटर डिझेलची किमंत ही 75 रु. आहे, एक लिटर डिझेलमध्ये ट्रॅक्टर 4 किलोमीटर चालते, तर एक किलो सीएनजीमध्ये देखील 4 किलोमीटरच चालते. त्यामुळे सीएनजी वापरल्यास शेतकऱ्यांची वर्षाला लाखोंची बचत होणार आहे. ट्रॅक्टर सीएनजीवर करण्यासाठी एक लाखाच्या आसपास खर्च येतो, तो कमी करण्यावर सध्या काम सुरू असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले आहेत.

फास्टटॅग लावण्यासाठी मुदतवाढ नाही

नागपूर शहर प्रदूषणमुक्त करणार

नगपूर लवकरच प्रदूषणमुक्त होईल, त्यासाठी विविध योजनांवर सध्या काम सुरू आहे. यासाठी महापौर दयाशंकर तिवारी देखील काम करत आहेत. अशी माहिती देखील यावेळी नितीन गडकरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.