ETV Bharat / state

Ajni Railway Bridge Demolish : १४० वर्ष जुना ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पूल पाडून लक्ष्मण झुला तयार केला जाणार, कामाला झाली सुरुवात

नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्टेशन शेजारी असलेला रेल्वे उड्डाण पुल लवकरच पाडला जाणार आहे. त्याठिकाणी रोप-वे तंत्रज्ञानाने तयार केला जाणारा लक्ष्मण झुला उड्डाण पूल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

author img

By

Published : Feb 15, 2023, 7:23 PM IST

Ajni Railway Bridge Demolish
अजनी रेल्वे पूल पाडला
अजनी रेल्वे पूल पाडला जाणार

नागपूर : अजनी पूल दक्षिण-पश्चिम नागपूरला पूर्व नागपूरसोबत जोडतो. अजनी पुलाचे वय साधारणपणे १४० वर्ष इतके आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अरुंद ठरत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ब्रिटिशांनी पुढील शंभर वर्षांचा अंदाज घेऊन बांधलेल्या या पुलाची उपयोगीता संपून ४० वर्ष अधिकचे झाले आहे. त्यानंतर आता रोप-वे तंत्रज्ञानाने तयार केला जाणारा लक्ष्मण झुला पूल तयार करण्याचे काम सुरू आहे.

पूल जड वाहनांसाठी बंद : ब्रिटिशांनी नागपूर शहरातील दोन महत्त्वाच्या उड्डाण पुलांचे निर्माणकार्य केले होते. त्यापैकी पोद्दारेश्वर राम मंदिराजवळही उड्डाणपूल सात वर्षांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र,अजनी पुलाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने नागरिकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावा लागत होता. ब्रिटिशांनी जेव्हा हा पूल बांधला होता. त्यावेळी साधारण तीन टन वजनाचे ट्रक घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात ५० ते ६० टन वजनाची जड वाहने या पुलावरून जात होती, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. म्हणून वाहतूक विभागाने पूल जड वाहनांसाठी बंद केला.

२१ महिन्यात तयार होईल लक्ष्मण झुला : रामझुला तयार झाल्यामुळे नागपूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. रामझुला यशस्वी झाल्याने आता अजनी रेल्वे स्थानका जवळ लक्ष्मण झुला बांधण्यात येणार आहे. अजनी ते मेडिकल चौकापर्यंतच्या या पुलाची लांबी २८३ मीटर राहणार असून २१ महिन्यांत त्याचे काम पूर्ण केले जाईल. पुलाच्या निर्माण कार्यासाठी साधारपणे ३३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुला शेजारील अतिक्रमणावर हथोडा : अजनी पुलाच्या एका बाजूला मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले होते. रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेल थाटण्यात आली होती. मात्र,आता पुलाच्या बांधकामास सुरुवात होत असल्याने अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडे होती. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी स्टीड ब्रिजचे कंत्राट महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. सहा पदरी पूल असून दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे.

माती परीक्षण सुरू : अजनी येथे लक्ष्मण झुला बांधण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षण सुरू झाले आहे. जुना पूल 2 महिन्यात पाडला जाईल. येथे सहा पदरी पुलाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत 333 कोटी रुपये आहे.

हेही वाचा - Police Arrested Suraj Jadhav : ऑटो रिक्षात आरडीएक्स असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.