नागपूर: लहान मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. नागपुरच्या वर्धा रोडवरील उड्डाण पुलावर हि घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. स्कुल व्हॅन उड्डाणपुलावरून धावत असताना व्हॅनचे चाक (school van skidded on the bridge) निखळले. मात्र,चालकाच्या लक्षात ही बाब आली नाही त्यामुळे व्हॅन बरेच अंतर तशीच एका बाजूने रोडवर घासत गेली. सकाळची वेळ असल्यामुळे उड्डाण पुलावर जास्त गर्दी नसल्यामुळे इतर कुठलेही वाहन या व्हॅनला धडकले नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा लहानग्यांचा जीव धोक्यात- दोन महिन्यांपूर्वी नागपुरच्या बेसा-बेलतरोडी या भागात एक स्कुल व्हॅन पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला जमलेल्या पाण्याच्या मोठ्या खड्ड्यात स्कूल व्हॅन पडली होती. त्या घटनेनंतर सुद्धा प्रादेशिक परिवहन(आरटीओ)(Nagpur RTO) विभागाने फारसे गंभीर पावलं उचलले नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा लहानग्यांचा जीव धोक्यात आला आहे.