ETV Bharat / state

कॉपी करताना पकडल्यास फेर परीक्षा द्यावी लागेल - नागपूर खंडपीठ

कॉपीचा कागद बाहेर फेकताना बारावीच्या एका विद्यार्थीनीला भरारी पथकाने पकडले होते. याबाबत तिला फेर परीक्षा देण्याच्या सूचनाही देण्यात आली होती. मात्र, त्या विद्यार्थीनीने या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने फेर परीक्षा द्यावेच लागेल, असा

नागपूर खंडपीठ
नागपूर खंडपीठ
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:09 PM IST

नागपूर - इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याने राज्य शिक्षण मंडळाने फेर परीक्षा देण्यास सांगितले होते. या निर्यणाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे आव्हान देण्यात आले होते. भरारी पथकाने रंगेहात पकडल्याने फेर परीक्षा द्यावी लागणार, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

काय आहे प्रकरण

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आर.के. विद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी ही 26 फेब्रुवारी, 2020 ला नियमित बाराव्या वर्गाची परीक्षा देत होती. याच दरम्यान रसायन शास्त्राचा पेपर सुरू होता. राज्य शिक्षण मंडळाने नेमलेले भरारी पथक परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी भरारी पथकाने तिला कॉपी असताना रंगेहाथ पकडले. यामुळे तिला पेपर लिहण्यास मानाई करत कारवाई करण्यात आली. यात राज्य शिक्षण मंडळाने तिला पुन्हा पेपर देण्यास सांगितले. मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने तिने या विरोधात नागपूर खंडपीठात आव्हान दिले.

खिडकीतून फेकताना दिसल्याने झाली होती कारवाई

यात विद्यार्थीनीने स्वतःची बाजू मांडताना भरारी पथक परीक्षा केंद्रावर आले त्यावेळी त्या खोलीत असणाऱ्यांनी इकडून तिकडे कॉपीचे चिटोरे फेकायला सुरुवात केली. यामुळे यात तिच्या पायाजवळ कॉपीची एक चिठ्ठी आली. यावेळी कॉपीचे ते कागद फेकत असताना पथकाने रंगेहात पकडले. तिला फेर परीक्षा देण्याचे सांगण्यात आले. पण, फेर परीक्षा मान्य नसल्याने तिने खंडपीठाकडे याचिका दाखल केली.

दोन्ही बाजू तपास दिला निर्णय

यात न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेतल्या. या प्रकरणात राज्य शिक्षण मंडळाने घेतलला निर्णय योग्य समजून तोच निर्णय कायम ठेवला. यामुळे त्या विद्यार्थीनीला फेर परीक्षा द्यावीच लागेल, असा निर्णय नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने दिला.

हेही वाचा - गुन्हेगारांसोबत काढलेल्या फोटोवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.