ETV Bharat / state

सततच्या शारीरिक-मानसिक जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीकडून सावत्र बापाची हत्या

नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सावळी गावात मुलीने सावत्र वडिलांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सावत्र वडिल सतत मुलीचा व तिच्या आईचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. त्यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

nagpur
नागपूर
author img

By

Published : May 17, 2021, 8:01 PM IST

नागपूर - एका तरुणीने स्वतःच्याच सावत्र वडिलांचा खून केला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील सावळी गावात घडली आहे. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (६०) असे खून झालेल्याचे नाव आहे. वडिलांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून या तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ज्या मुलीवर वडिलांच्या खुनाचा आरोप झालेला आहे ती १७ वर्षीय आहे. ती विधीसंघर्ष गटात मोडते.

ज्ञानेश्वरने पंधरा वर्षांपूर्वी वंदना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. काही दिवस सावळी येथे एकत्रित राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी येथे एकटाच राहायला गेला होता. त्यातही अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे येत होता. येथे आल्यानंतर तो पत्नी वंदना आणि सावत्र मुलीला सतत त्रास देत असे. त्यातच आज (17 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर सावळीला दारू पिऊन आला. यावेळी त्याने सावत्र मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. सावत्र वडिलांचा त्रास सहन न झाल्याने त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्याचवेळी पीडित मुलीने लाकडी दांडक्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर मारा केला. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ठाणेदार सरीन दुर्गे हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - विजेचा खांब डोक्यात पडल्याने पाम बीच रोडवर तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.