नागपूर : काहीजण दर्शनासाठी येताना तोडके कपडे घालतात असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी नागपुरातील मंदिरांच्या विश्वस्तांनी असे कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मंदीरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोडही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील 25 हून अधिक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील 300 हून अधिक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू करण्यासाठी फेडरेशनच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे मंदिराच्या विस्तांनी सांगितले.
यामागे भूमिका अशी आहे की : सरकारी कार्यालयामध्ये 2020 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वस्त्र कुठली असली पाहिजे असा ड्रेस कोड लागू केला आहे. आज भारतामध्ये अनेक मंदिर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर, महाकालेश्वर पद्मनाथ स्वामी मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वस्त्र संहिता लागू आहे. माध्यमातून मंदिरातलं मांगल्य जपले जातात. म्हणून नागपुरात चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिंता लागू करण्यात येत आहे.
मंदिरात असेल पर्यायी व्यवस्था : जर कुणी भक्त तोडक्या कपड्यांमध्ये मंदिरात आला तर, मंदिरांच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्यासाठी वस्त्र ठेवण्यात यतील. त्यांनी ते वस्त्र परिधान करुनच मंदिरात प्रवशे करावा अशी विनंती संस्थांनामार्फत करण्यात येणार आहे. भाविकांना ती विनंती करण्यात येईल की मंदिरात जाताना ओढणी पांघरून मंदिरात जावे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची असुविधा होणार नाही.
ड्रेस कोड संदर्भात जनजागृती : काही दिवसापूर्वीच तुळजापूरची घटना समोर आली होती. त्यांचे विश्वस्त सरकारी असल्यामुळे हा ठराव तुळजापूरच्या मंदिरात झाला होता. त्या अनुषंगाने बोर्ड देखील लावण्यात आला होता. परंतु हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, यासंबंधी आम्ही प्रबोधन करणार, सरकारला सुद्धा विनंती करणार आहे, असे सुनील घनवट यांनी म्हटले आहे. जी सरकारी प्रशासकीय मंदिरे आहेत त्या जागी देखील ड्रेस कोड लागू करण्यात यावा. लोकांना या ड्रेस कोड संदर्भात गांभीर्य निर्माण व्हावे, त्याचे पालन करण्यात यावे त्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार असल्याचे घनवट म्हणाले.
मंदिरात येताना नियम पाळा : कुठले कपडे घालावे त्याचा प्रत्येकाचा खासगी विषय आहे. मात्र, मंदिर हे पवित्र मंगल स्थान आहे. हे ईश्वराचे ठिकाण आहे, म्हणून मंदिरात येताना नियम पाळले गेले पाहिजे. अशी मंदिर प्रशासनाची सगळीकडची भूमिका आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा पुरोगामी विचारांची लोक असतील अशी भूमिका घेतल्यावर लगेच गळा आवळून ओरडायला सुरुवात करतील. आधुनिकतावादी लोकं अन्य धर्म यांच्या बाबतीत कधी बोलत नाही. मात्र, हिंदूंच्या मंदिरांबाबत किंवा सिंधू धर्माबाबत बोलताना अडचण काय असा प्रश्न सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -