ETV Bharat / state

'म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन कोटा अद्याप केंद्र सरकारने वाढवून दिला नाही'

author img

By

Published : May 22, 2021, 10:04 PM IST

Updated : May 22, 2021, 10:28 PM IST

म्युकरमायकोसिस तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात एम्फोटेरेसीन बी याकडे इंजेक्शनचा पूरवठा कमी आहे. यामुळे तुटवडा निर्माण होत आहे. या इंजेक्शन वितरणाचे सर्व अधिकार केंद्रसरकारकडे असल्याने त्यांचाकडून अद्याप राज्याने मगितलेला कोटा वाढवून देण्याच्या मागणीवर वाढवून दिला नाही, असे मंत्री नितीन राऊत म्हणाले.

नितीन राऊत
नितीन राऊत

नागपूर - म्युकरमायकोसिस तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात एम्फोटेरेसीन बी याकडे इंजेक्शनचा पूरवठा कमी आहे. यामुळे तुटवडा निर्माण होत आहे. या इंजेक्शन वितरणाचे सर्व अधिकार केंद्रसरकारकडे असल्याने त्यांचाकडून अद्याप राज्याने मगितलेला कोटा वाढवून देण्याच्या मागणीवर वाढवून दिला नाही. यामुळे एक हजार इंजेक्शन असल्याने 100 ते 200 मिळत आहे. यात मोठा तुटवडा निर्माण होत आहे असे नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.

बोलताना मंत्री राऊत

नागपूरच्या विभागीय कार्यालयातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. पूर्वी म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन हे केवळ शासकीय रुग्णालयांना दिले जात होते. आता मात्र शासकीय रुग्णालयासोबत खासगी रुग्णलयांची मागणी असल्याने त्यांनाही इंजेक्शन द्यावे, अशा सूचना आणल्याने ते देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेऊ

निर्बंध शिथिल करण्यासाठी एसोपी तयार केल्या जात आहे. किमान 10 ते 12 दिवस त्यासाठी लागणार आहे. त्यानंतर जेव्हा निर्बंध हळूहळू उठेल या अनुषंगाने ते उठल्यावर अमरावती सारखी परिस्थिती उद्भवू नये. यासाठी दुकाने उघडल्यास अचानक गर्दी टाळली जावी. दुकानदार, कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असून दुकाने उघडणाऱ्यांनी लस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे की अशा पद्धतीने नियमावली तयार करण्यात येईल, असेही पालकमंत्री राऊत म्हणाले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी साडे तीनशे बेडचे नियोजन

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी 700 बेडचे नियोजन होते. पण, आता तीनशे बेड तयार होऊ शकतात. त्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्ण मिळणार त्या रुग्णांवर तिथेच उपचार झाले पाहिजे, असे नियोजन होते. यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोयीसुविधांसाठी सीएसआरमधून 25 कोटी रुपये विदर्भ सहायता निधीमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. ते दोन-तीन दिवसांत प्राप्त होईल यातून ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकटीकरणचे काम केले जाईल, असेही पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.

हेही वाचा - सावधान...लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो 'म्यूकरमायकोसिस', कोरोनानंतर मुलांची घ्या काळजी...

Last Updated : May 22, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.