नागपूर: मान्सून भारतात दाखल होण्यासाठी आणखी चार दिवसांचा विलंब होणार असल्याने, त्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भात देखील मान्सून निर्धारित वेळेपेक्षा उशिराने येईल हे स्पष्ट झाले आहे. विदर्भात भीषण गर्मी असून उष्णता लाट वाहत असून मान्सूनचे आगमन होण्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट बघावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भीषण उष्णतेची: नवतपा संपला की, विदर्भातील लोकांचे लक्ष पावसाळा कधी सुरू होतो याकडे लागलेले असते. नवतपा हा लोकांना भीषण उष्णतेची धडकी भरवणारा काळ असतो. नवतपा संपून पाच दिवस लोटले तरी, मान्सूनला पोषक असे वातावरण अद्याप निर्माण झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कामे खोळंबली आहेत. यावर्षी नवतपामध्ये उष्णता जाणवली नसली तरी नवतपानंतर मात्र, सूर्य आग ओकत आहे.
मान्सून भारतात दाखल होण्यासाठी आणखी चार दिवसांचा विलंब होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भात देखील मान्सून निर्धारित वेळेपेक्षा उशिराने मान्सूनचे आगमन होणार आहे - एम एल साहू, उपसंचालक
विदर्भात सामान्य पाऊस: हवामान खात्याने भारतात मान्सूनचा प्रवास कसा (लॉंग रेन फॉरकास्ट) राहील यासंदर्भात अंदाज व्यक्त केला आहे. मध्यभारतात मान्सून सामान्य राहणार आहे, मात्र पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात मान्सून कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार असून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सून चांगला राहणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
तापमानात वाढ, लोकांचे हाल: जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मान्सून दाखल होतो. जूनचा पहिला आठवडा लोटला असून अद्याप मान्सून केरळमध्ये आला नसल्याने, विदर्भात मान्सून येण्यास जूनचा तिसरा आठवडा उजाडेल अशी परिस्थिती आहे. अश्यात विदर्भातील अनेक जिल्ह्याच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी विदर्भातील अकोला, अमरावती व वर्धा या जिल्ह्याचेच तापमान 45 डिग्रीच्या जवळपास गेले. पुन्हा तापमान वाढत असल्याने या वेळी पारा 45 च्या पुढे जाण्याची भीती आहे.
यावर्षी सरासरी पाऊस : गेल्या आठवड्यात असे सांगितले होते की, भारतीय हवामान खात्याने (IMD) या वर्षी सामान्य म्हणजेच ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला होता. हा अंदाज 5 टक्क्यांनी कमी किंवा जास्त बदलू शकतो असे हवामान खात्याने सांगितले होते. तसेच 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टी मानला जातो. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यास तो दुष्काळ समजला जातो. यावर्षी भारतात सर्वसाधारण पाऊस अपेक्षित आहे. ही बाब शेतीबरोबरच अर्थव्यवस्थेसाठीही समाधानाची आहे.
हेही वाचा -