ETV Bharat / state

नागपुरातील 'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही - corona nagpur news

नागपुरातील मेयो रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही
'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही
author img

By

Published : Mar 31, 2020, 10:23 AM IST

नागपूर - येथील इंदिरा गांधी शासकीय (मेयो) रुग्णालयात काल (सोमवार) एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

संबंधित रुग्ण गेले काही दिवस न्यूमोनियाग्रस्त होता. त्याच्यावर अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल दुपारीच त्याला मेयो या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला होता. तर, त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला की काय, असा संशय निर्माण झाला होता. त्यामुळे, नियमाप्रमाणे त्याचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले होते. ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.