नागपूर - उत्तरी भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. यामुळे येत्या ३ दिवसात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शहरात सध्या हुडहुडी भरवणारी थंडी पडत आहे. विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद शहरात झाली आहे. ८ अंशांनी तापमान खाली घसरत ५.१ अंश सेल्सियसवर पोहचले आहे. 2 दिवसांचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर थंडी वाढली आहे. उत्तरी भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात कमालाची घट झाली आहे. शनिवार आणि रविवार तापमानात घट राहील. या उत्तरी वाऱ्यांमुळेच ३० ते ३१ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक