नागपूर: कौटुंबिक वादातून एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे मोठे वडील आणि मोठ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. जगमोहन यांच्यासोबत पटत नसल्याने त्यांची पत्नी एका मुलासह वेगळ्या राहतात तर मोठे भाऊ ब्रीजमोहन आणि त्यांची पत्नी हे एकत्र राहायचे. ब्रीजमोहन यांना अपत्य नसल्याने त्यांनी जगमोहन यांच्या मुलाला ब्रीजमोहन यांच्याकडेचं राहायचा. काल रात्री जगमोहन आणि ब्रीजमोहन यांच्यात काल वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की बालकासह ब्रीजमोहन आणि त्यांच्या पत्नीने जगमोहन यांना लाथा-भुक्यांनी मारहाण केली. जगमोहन यांच्या पत्नीला माहिती समजताच त्यांनी शेजाच्यांच्या मदतीने जगमोहन यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता.
हेही वाचा : Solapur Crime News : सुलेमानी खड्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा