नागपूर - शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेल्वे रुळाबाजूला आज(सोमवार) एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. प्रथमदृष्ठ्या त्या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धीरज साळवे असे मृत्यू झालेल्या या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
धीरज साळवे हा नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह सोमवारी रेल्वे रुळाच्या बाजूला संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याच्या हात, पाय आणि गळ्यावर मारल्याचे निशाण आढळून आले आहेत. यामुळे, धीरजची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे. मात्र, ही हत्या कोणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट नसून पोलीस तपासाअंती या हत्येमागचे कारण स्पष्ट होईल.