नागपूर - जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठयाचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 11 शासकीय कोविड हॉस्पीटलमध्ये 61.5 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन तर खासगी 170 रुग्णालयांना सुमारे 8 हजार 622 जम्बो सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.
कोविड रुग्णांना ऑक्सिजन अभावी उपचारामध्ये बाधा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन निर्माते, वितरक, शासकीय आणि खासगी कोविड हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा निश्चित केला असून त्यानुसार वितरणाचे धोरण जाहीर केले आहे.
ऑक्सिजन संदर्भातील तक्रार निवारण्यासाठी नियंत्रण कक्ष -
हॉस्पीटलनिहाय नियोजनानुसार वितरकांकडून थेट रुग्णालयांना पुरवठा होणार आहे. ऑक्सिजन पुरवठया संदर्भात असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0712-2567021 तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0712-2562668 आजपासून कार्यान्वित झाले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, सतीश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन तर खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा - लिक्विड ऑक्सिजन
जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठयाचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 11 शासकीय कोविड हॉस्पीटलमध्ये 61.5 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन तर खासगी 170 रुग्णालयांना सुमारे 8 हजार 622 जम्बो सिलेंडर उपलब्ध होणार आहे.