नागपूर - विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे. पुरवणी मागण्यात विदर्भाला आणि शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याच्या मुद्यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच महायुतीला बहुमत असतानाही सत्ता सरकार स्थापन करू न शकल्याबाबत जनतेची त्यांनी माफी मागितली.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये विदर्भाला आणि शेतकऱ्यांना काही मिळाले नसल्याच्या मुद्यावर माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विचारले असता, या सरकारकडून जास्त अपेक्षा करणे गैर असल्याचे ते म्हणाले. राज्यात इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता होती, 47 वर्ष राज्य करणाऱ्यांनी आजवर विदर्भाला काहीच दिले नाही. तर आता या सरकारकडून काय अपेक्षा केली जाईल, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक - प्रविण दरेकर
महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सत्तेसाठी शिवसेनेने वेगळी चूल मंडळी आहे. याकरता मी माझ्या पक्षाकडून आणि शिवसेनेकडून जनतेची माफी मागतो, असे वक्तव्य यावेळी मुनगंटीवार यांनी केले. आता ही वेळ जनतेत जाऊन जनतेसमोर आपले म्हणणे मांडण्याची असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द नाही - आशिष शेलार