ETV Bharat / state

'खोटी माहिती पसरवल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा' - सुधीर मुनगंटीवार नवाब मलिक गुन्हा मागणी

राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, तरी देखील महाविकास आघाडीतील नेते केंद्र सरकारवर खोटे आरोप करत आहेत. जनतेपर्यंत चुकीची माहिती पोहचवणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Sudhir Mungantiwar and Nawab Malik
सुधीर मुनगंटीवार आणि नवाब मलिक
author img

By

Published : Apr 19, 2021, 8:30 AM IST

Updated : Apr 19, 2021, 8:44 AM IST

नागपूर - कोरोनाच्या संकटावर केंद्रसरकारला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक करत आहेत. खोटे आरोप करून जनतेच्या मनात भीती पसरवण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५४ अन्वये राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत केली.

गुन्हा दाखल करा -

देशभरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कौशल्य विकास विभागाची जबाबदारी पाहणारे नवाब मलिक आपले कौशल्य केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी उपयोगात आणत आहे. महाराष्ट्राला रेमडेसीवीरचा पुरवठा होऊ नये यासाठी केंद्र सरकार कंपन्यावर दबाव आणत असल्याचा खोटा आरोप मलिक यांनी शनिवारी केला होता. मंत्रीपदावर असून जनतेमध्ये खोटी माहिती पसरविणे हा गुन्हा आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने त्यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. या गुन्ह्यात एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात राज्य सरकारने हालचाल न केल्यास राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करण्याची विनंती करू, असेही मुनगंटीवार म्हणाले.

हा तर राजकीय दहशतवाद निर्मितीचा प्रयत्न -

महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शनसाठा उपलब्ध व्हावा यासाठीच भाजपच्यावतीने ब्रुक फार्मा कंपनीशी संवाद साधण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी परवाना मिळवून दिला आहे. मात्र, कंपनीच्या मालका भीती दाखवून खंडणीखोर सरकारने नवा राजकीय दहशतवाद निर्माण केल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवत खोटे आरोप करण्याची सवय राज्यातील महाविकास आघाडी सरकारला झाली आहे. त्यामुळे आता मागील काही कालावधीत केंद्र सरकारकडून राज्याला नेमकी किती मदत मिळाली, याची श्वेतपत्रिका राज्य सरकारनेच काढावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिले. लस उपलब्धतेवरही असाच कांगावा सुरू होता. राज्याला आतापर्यंत १ कोटी २९ लाख डोस उपलब्ध झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १७ लाख लस शिल्लक आहेत, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नाने विदर्भात भिलाई स्टील प्लँटकडून प्राणवायु मिळवला जातो. पंतप्रधानांनी पेटंट कायद्यातील अडसर दूर करून १७ कंपन्यांना रेमडेसीवीर निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. रेमिडीसीवीरचे उत्पादन दुप्पट होण्यास मदत मिळणार आहे. असे असताना राज सरकारचे लोक मात्र राजकारण करत आहेत, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

हेही वाचा - LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Last Updated : Apr 19, 2021, 8:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.