नागपूर : शिक्षकांमुळे माझ्यात मराठी साहित्याची आवड निर्माण झाली. महापुरुषांवरील पुस्तकांसोबत स्नेहबंध जुळले. याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. थोर महात्मे होऊन गेले. चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हे वाक्य आजही माझ्या स्मरणात असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. मी शालेय जीवनात ध्येय निश्चित केले नव्हते. मला क्रिकेटची खूप आवड होती, असे गडकरी म्हणाले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न गडकरी मास्तरांचे उत्तरं : प्रश्न-शाळकरी गडकरी कसे होते- उत्तर - मला मराठी हा विषय खूप आवडायचा. इतिहासाची गोडी निर्माण झाली होती. राजकारणापेक्षा माझा समाजकारण करण्यात विश्वास आहे. शाळेतून मला मराठी वाचनाचा छंद लागला होता. त्यामुळे मला वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धेत पुरस्कार मिळाले आणि गोल्ड मेडल मिळाले. प्रश्न- नवयुवक विद्यालयातील आठवणी स्मरणात आहेत का?- उत्तर - हो, पिटी, योगासने करायचो, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, या सर्व बाबी मला आठवतात.
तुम्ही देखील नोकरी मागण्यापेक्षा देणारे व्हा : प्रश्न- जीवनात ध्येय निश्चित केले होते का? छंद कोणते- उत्तर- मी काहीही निश्चित केले नाही. छंद भरपूर होते. जसे की, क्रिकेट, नाटक, संगीत पण आता वेळ मिळत नाही. मी स्वतः स्वयंपाक करायचो. आता वेळ मिळत नाही परंतु कोविड काळात प्रयत्न केले. प्रश्न- राजकारणाकडे कसे वळले- उत्तर- मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. १९७५ मध्ये आणीबाणी आली, त्या विरोधात संघर्ष केला. १९७७ साली जनता पार्टीत गेलो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. निवडणूका लढवणे आणि जिंकणे म्हणजे राजकारण नाही. राजकारण म्हणजे सेवा, सेवाकारण, सर्वांगीण विकास, गाव, गरीब, मजदूर किसान सर्वांचा विकास शिक्षण, राजकारण म्हणजे विकासकारण, समाजकारण, सेवाकारण, राष्ट्रकारण, देशाच्या हितासाठी काम करणे म्हणणे राजकारण. शिक्षण झाल्यानंतर मी विद्यार्थी लीडर म्हणून निवडणूक लढवली. मी वकिली करण्याऐवजी उद्योग व्यावसायकडे वळलो. नेहमी म्हणायचो की मी नोकरी मागणार नाही तर देणारा होईल. आज 15 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही देखील नोकरी मागण्यापेक्षा देणारे व्हा.
हेही वाचा : 1. President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू