ETV Bharat / state

नागपुरात कडक संचारबंदी लागू होणार - nagpur corona latest news

१५ मार्चपासून सुरू होत असलेल्या संचारबंदी दरम्यान वाहनचालकांची नियमावली पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

अमितेशकुमार
अमितेशकुमार
author img

By

Published : Mar 13, 2021, 5:01 PM IST

नागपूर- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नागपूर शहरात झपाट्याने होत असल्यामुळे प्रशासनाकडून तब्बल तीन आठवडे शनिवार आणि रविवारी वीक एंड कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले होते, मात्र नागपूरकरांनी या विकेंड कर्फ्युला ठेंगा दाखवल्यामुळे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा गाठला आहे. कोरोनाच्या वेग लक्षात घेता शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 ते 21 मार्चदरम्यान कडक संचारबंदी लावण्याचे आदेश पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहे. नागपूर पोलीस दल संपूर्ण क्षमतेने संचारबंदीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. एवढचं नाही तर संचारबंदी दरम्यान बेजबाबदारपणाचे वर्तन करणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

नागरिकांमुळेच कडक कर्फ्यू लावण्याची वेळ
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर १५ ते २१ मार्च दरम्यान पोलीस आयुक्ताल्या अंतर्गत येत असलेल्या भागात कडक संचारबंदी लावली जाणार असल्याची घोषणा केली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी पोलिसांना करायची आहे,त्यामुळे पोलीस यंत्रणा पूर्णपणे तयार असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बधितांचा आकडा हा दोन हजारांपर्यंत गेल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. सुरवातीला विकेंड कर्फ्यु च्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात होता,मात्र नागरिक प्रतिसाद देत नसल्याने १५ ते २१ मार्च दरम्यान कडक कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.

वाहनचालकांसाठी नियमावली जाहीर
१५ मार्चपासून सुरू होत असलेल्या संचारबंदी दरम्यान वाहनचालकांची नियमावली पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. दुचाकीवरून केवळ एकच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे, तर कारमध्ये दोघांना प्रवास करण्याची परवानगी पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे

शहराची सीमा सील केली जाणार
या दरम्यान शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौका चौकात पोलिसांकडून बेजबाबदार नागरीकांवर कारवाई केली जाणार आहे,या शिवाय शहराची सीमा देखील सील करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या दरम्यान शहरात तब्बल १०० ठिकाणी नाका बंदी लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

लसीकरण सुरू राहणार
कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने शहरात १५ ते २१ मार्च दरम्यान कडक कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. या काळात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी पोलिस यंत्रणा मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

काय सुरू आणि काय बंद राहील
पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान शहरात लॉक लावण्याची घोषणा केल्यानंतर या काळात शहरात कोणत्या सुविधा सुरू राहतील या संदर्भात माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये रुग्णालयात, औषधांचे दुकान,डोळ्यांचे दवाखाने, चष्माचे दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय शहरातील उद्योग सुरू राहणार आहेत,शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहील, भाजीचे दुकाने सुरू राहतील. थेट दुकानांमध्ये दारू विक्री होणार नाही मात्र ऑनलाइन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे तर मास विक्रीचे दुकाने सुरू राहणार आहेत. शहरातील खासगी कार्यालय मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.

हेही वाचा- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या वाहनांवर 'जय महाराष्ट्र'चे फलक

हेही वाचा- ट्विटरवर रेल्वेची टिव-टिव बंद होणार का? रेल्वेकडून 'कू अ‌ॅपला' पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.