नागपूर - सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्र तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
१६ डिसेंबरपासून सुरु असणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार दक्ष असल्याचे म्हटले. तसेच महिला सुरक्षेच्या बाबतीत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य सरकार करणार आहे.
-
"महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र तडजोड करणार नाही. जे कोणी अत्याचारी असतील त्यांची सुटका होणार नाही. अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे#MahaVachanPurti pic.twitter.com/FehGn49uzc
">"महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र तडजोड करणार नाही. जे कोणी अत्याचारी असतील त्यांची सुटका होणार नाही. अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 21, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे#MahaVachanPurti pic.twitter.com/FehGn49uzc"महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र तडजोड करणार नाही. जे कोणी अत्याचारी असतील त्यांची सुटका होणार नाही. अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 21, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे#MahaVachanPurti pic.twitter.com/FehGn49uzc
आजच्या दिवशी सरकारने मोठे निर्णय घेतले.
१) शेतकऱ्यांना सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी
२) १० रुपयांमध्ये जेवण (शिवभोजन योजना)
३) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय उभारणार
४) विदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करणार
५) विदर्भात प्रकल्प उभारुन समृद्धी आणणार