ETV Bharat / state

977 प्रवासी घेऊन श्रमिक एक्सप्रेस लखनौकरिता रवाना - स्थलांतरित कामगार

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्व नागरिकांना आपल्या गावी परत जात असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये नागपूर विभागातील 977 प्रवाशांमध्ये गडचिरोली 108, चंद्रपूर 289, भंडारा 133, वर्धा 220, नागपूर 227 प्रवासी यांचा समावेश आहे.

977 प्रवासी घेऊन श्रमिक एक्सप्रेस लखनौकरिता रवाना

author img

By

Published : May 3, 2020, 10:45 PM IST

नागपूर - शहरातून उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसाठी आज एक विशेष श्रमिक एक्स्प्रेस ट्रेन रवाना झाली आहे. 24 डब्यांच्या या विशेष ट्रेनमधून सुमारे 977 मजूर त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून आलेले मजूर या ट्रेनने उत्तर प्रदेशात रवाना झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्व नागरिकांना आपल्या गावी परत जात असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये नागपूर विभागातील 977 प्रवाशांमध्ये गडचिरोली 108, चंद्रपूर 289, भंडारा 133, वर्धा 220, नागपूर 227 प्रवासी यांचा समावेश आहे.

977 प्रवासी घेऊन श्रमिक एक्सप्रेस लखनौकरिता रवाना

लॉकडाउनच्या काळात विविध सरकारी कॅम्पसमध्ये राहत असलेल्या 977 मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या ट्रेनमधून त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यासाठी निवडण्यात आले होते. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आज संध्याकाळी या 977 मजुरांना बसने रेल्वे स्टेशन जवळ आणले. तेथून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घेत या सर्वांना रेल्वे प्रशासनाने सर्वांना रेल्वे स्टेशनच्या आत घेण्यात आले. त्यानंतर सर्वांची बसण्याची व्यवस्थित करून देण्यात आली. ही विशेष ट्रेन इटारसी, झाशी, कानपूरमार्गे लखनौला जाणार आहे. मात्र, मजुरांना फक्त लखनौला उतरता येणार आहे. दरम्यान, या ट्रेनमधून गेलेल्या प्रवाशांकडून 505 रुपये भाडे घेण्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.