नागपूर : शहरातील रहिवासी शुभांगी मनीष गण्यारपवार (वय 31 ) यांना ब्रेन हॅमरेजने झाला होता. त्यामुळे त्यांचा मेंदू जरी निकामी झाला असला तरी त्यांचे ह्रदय हे अगदी व्यवस्थितपणे काम करत होते. त्यामुळे या ह्रदयाचा फायदा कुणाचा तरी जीव वाचण्यासाठी होऊ शकतो म्हणून शुभांगी गण्यारपवार यांच्या कुटुंबाने ते हृदय दान केले आहे.
हृदय पुण्याला एअरलिफ्ट केले : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरायसीस सायन्सेस या पुण्यातल्या रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका पेशंटसाठी हे जिवंत हृदय नेण्यात आले आहे. पुण्यातील रुग्णाला हृदयाची गरज होती. त्याकरिता ऑर्गन डोनेशन कमिटी मार्फत शोध सुरू असताना, नागपूर येथे ब्रेन डेड झालेल्या एका व्यक्तीचे जिवंत हृदय उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. यावेळी ब्रेनडेड व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांसोबत संपर्क साधला. त्यांना अवयव दान करण्याच्या दृष्टीने महत्त्व पटवून दिले. कुटुंबानेही तात्काळ यासाठी होकार देताच नागपूरवरून हृदय पुण्याला एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू करण्यात आली. आज अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
ग्रीन कॉरिडोरमुळे झाले शक्य : पुण्यातल्या एका रुग्णासाठी नागपूरमधून एक जिवंत हृदय एअरलिफ्ट करण्यात आले. एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी जिवंत हृदयाची पुण्यात आवश्यकता होती. नागपूर येथे जिवंत ह्रदय उपलब्ध असल्याने एअरलिफ्ट करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जिवंत हृदय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलपासून तर नागपूर येथील वायुसेना बेसपर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. त्यानंतर भारतीय वायुसेनेच्या ए एन 32 या विशेष विमानाने हे जिवंत हृदय पुण्याला पोहोचवण्यात आले आहे.
इतरही अवयव दान केल्याने शुभांगी जिवंतच : हृदय दान केल्यानंतर शुभांगीचे लिव्हर आणि लंग्ज देखील दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला होता. त्यानुसार किडनी वोक्हार्टमधील एका रूग्णाला तर दुसऱ्या रूग्णाला लिव्हर देण्यात आले. याशिवाय दुसरी किडनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रूग्णाला देण्यात आली आहे.
हेही वाचा -