नागपूर - आरेची जागा खासगी विकासकाला देऊन तिथे घर बांधण्याची भूमिका शिवसेना घेत असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आरे वृक्षतोड प्रकरणी शिवसेनेने मेट्रो कार शेडला विरोध केला होता.
हेही वाचा - 'अधिवेशनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च; मात्र विदर्भाला काय मिळाले?'
नगर विकास विषयावर चर्चा सुरू असताना अशा प्रकारची मागणी केल्याचे भातखळकर म्हणाले. शिवसेनेने आरेला जंगल घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत येताच त्यांनी पलटी मारली असून हा प्रयत्न कोणत्या बिल्डर साठी केला जात आहे. याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. आरे कॉलनीत पिढया- न पिढ्या राहत असलेल्या आदिवासी लोकांना तिथून हुसकावून लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. तो आम्ही हाणून पाडू असेही ते म्हणाले.