नागपूर - मी क्रिकेटचा खेळाडू नसून, प्रशासक आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांना टोला लगावला. क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की मी क्रिकेट खेळाडू नसून क्रिकेटचा प्रशासक राहिलो आहे. माझ्याकडे काही सत्ता स्थापनेचे सूत्र नसून, दोन्ही पक्षांनी आपली टीम तयार केल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली
हेही वाचा - काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते. शेवटच्या क्षणाला तुम्हाला वाटतं असतं की तुम्ही हा सामना गमावणार मात्र ऐनवेळी निकाल हा अगदी उलट लागतो आणि तुम्ही विजयी होता. तोच नियम राजकारणात सुद्धा लागू असल्याचे गडकरी म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले त की मी क्रिकेट खेळाडू नाही तर क्रिकेटचा प्रशासक राहिलो आहे. माझ्याकडे काही सत्ता स्थापनेचे सूत्र नाही. पण आमच्या दोन्हीं पक्षांनी आपली टीम तयार केली आहे. लवकरच याचा निकाल लागेल आणि राज्याला स्थिर सरकार मिळेल असेही पवार म्हणाले.