ETV Bharat / state

Nagpur Family Court on Divorce : पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा क्रूरतेचा प्रकार; न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

नवऱ्याने पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात कापड कोंबून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा क्रूरतेचा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत नागपूरच्या कुटुंब न्यायालयाने एका महिलेला घटस्फोट मंजूर केला आहे.

Nagpur Bench on Divorce
न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट
author img

By

Published : Feb 21, 2022, 6:55 PM IST

नागपूर - नवऱ्याने पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात कापड कोंबून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा क्रूरतेचा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत नागपूरच्या कुटुंब न्यायालयाने एका महिलेला घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी म्हणजे गुलाम नाही. मात्र, काही अघोरी मानसिकतेचे लोक पत्नीला गुलाम समजून क्रुरतापूर्वक व्यवहार करतात, असं निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवलं आहे.

या प्रकरणातील पीडितेचे वय केवळ 22 इतके आहे,तर पती हा 28 वर्षांचा आहे. दोघांचे लग्न 2017 साली झाले होते. महिलेच्या पतीला दारूचे व्यवसन आहे. दारू पिऊन तो पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचे हातपाय बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. बळजबरीच्या वेदनेमुळे पत्नी ओरडू नये, आणि तिचा आवाज खोली बाहेर जाऊ नये या करिता तो तिच्या तोंडात कापड कोंबायचा. खोलीच्या आत घडलेल्या प्रकारची वाच्यता कुठे केल्यास गंभीर परिमाण भोगावे लागतील असा धमकीवजा इशारा देत असल्याने ती काही वर्षांपासून नवऱ्याचा अत्याचार सहन करत होती, मात्र त्रास असह्य झाल्याने तिने हिम्मत करून नवऱ्याचे घर सोडले आणि आपली आपबीती कुटुंबाला सांगितली.

हेही वाचा - Aaditya Thackeray criticized : फडणवीसांना सत्ता गेल्यापासून नैराश्य, त्यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही : आदित्य ठाकरे

घटस्फोटाचा अर्ज केला दाखल -

नवऱ्याच्या क्रूरतेचा कंटाळून 22 वर्षीय फिर्यादी महिलेने सासर सोडून माहेरी आसरा घेतला. कुटुंबाला सर्व प्रकाराची माहिती दिल्यानंतर नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने पीडित तरुणीचं म्हणणं ऐकून न्यायालयाने तिला घटस्फोट मंजूर केला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.