ETV Bharat / state

नागपूरच्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने विकसित केली बियाविरहीत संत्रा-मोसंबी - नागपूर संत्रा बातमी

संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व बियाविरहीत (सिडलेस) आहेत. फक्त एक किंवा दोनच बिया यात असून येत्या चार ते पाच वर्षात ही फळे विदर्भातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Oct 7, 2020, 9:18 PM IST

नागपूर - येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व बियाविरहीत (सिडलेस) आहेत. फक्त एक किंवा दोनच बिया यात असून येत्या चार ते पाच वर्षात ही फळे विदर्भातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत.

लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने विकसित केली बियाविरहीत संत्रा-मोसंबी

नागपुरी संत्रा आणि मोसंबीला पर्याय म्हणून या नवीन बियाविरहीत फळांकडे बघितले जात आहे. संत्र्यामध्ये डेजी आणि पर्ल टैजैंलो या नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत. डेजी हा संत्रा फळ असून विदर्भातील वातावरणात याचे उत्पादन चांगले आणि लवकर घेता येणार आहे. संत्र्याचे झाड जस-जसे वाढेल तसे उत्पादन देखील वाढेल, अशा प्रकारचे हे फळझाड आहे.

हेही वाचा - नागपुरात जोरदार पावसाला सुरूवात; उकाड्यापासून काहीसा दिलासा

पर्ल टैजैंलो हे संत्रा फळ असून नागपुरी संत्र्याला पर्याय म्हणून बघता येऊ शकते. मोसंबीमध्ये ब्लड रेड माल्टा, जाफा, वेस्टिन आणि हेमलीन हे चार मोसंबीचे फळ विकसित करण्यात आलेले आहे. येणाऱ्या चार किंवा पाच वर्षांत ही फळे विदर्भातील बाजारपेठेत दिसणार असून शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. या नवीन विकसित करण्यात आलेल्या बियाविरहीत संत्रा आणि मोसंबीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडेल यात शंका नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.