नागपूर: महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे सुचविले होते. नागपूर जिल्ह्यात दररोजची रुग्णसंख्या चार हजाराच्या घरात असून टक्केवारी 50 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सध्या मुलांना शाळांमध्ये एकत्रित आणणे उचित ठरणार नाही. यासंदर्भात जिल्ह्याच्या कोरोनाविषयक टास्कफोर्सने देखील बाधितांची संख्या बघून निर्णय घेणे योग्य ठरेल असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 31 जानेवारीला यासंदर्भातील आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
1 जानेवारी पासून नागपूर शहरात आणि जिल्हात कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढू लागला होता. सुरुवातीला हा दर 1 टक्यांच्या आता होता,मात्र सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर हा 50 टक्यांच्या जवळ गेला आहे. सध्याच्या स्थितीत नागपुर जिल्हात सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजार झालेली आहे,त्यामुळे पुढील काही दिवस शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
नागपुर जिल्हातील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंदच
नागपूर जिल्ह्यामध्ये (Nagpur district) सतत वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Schools closed till January 31 ) ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Zilla Parishad Chief Executive Officer Yogesh Kumbhejkar) यांनी या संदर्भात रात्री उशिरा माहिती दिली.