ETV Bharat / state

उन्हाचा तडाखा वाढला; नागपुरातील सर्वच शाळांना सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतरही नागपुरातील अनेक शाळा अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे या सर्व शाळा आजपासून बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2019, 1:20 PM IST

नागपूर - शहरात तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे विविध शासकीय यंत्रणांनी 'हिट ऍक्शन प्लॅन' अंतर्गत उपाय योजना करायला सुरुवात केली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतरही नागपुरातील अनेक शाळा अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे या सर्व शाळा आजपासून बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशही दिले आहेत.

जिल्हाधिकारी माहिती देताना

नागपुरातील काही शाळांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. मात्र, अनेक केंद्रीय शाळांचे वर्ग सुरू आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज वर्तविल्यानंतर नागपूर जिल्हा प्रशासनाने आज पासून शाळा बंद करण्याचे निर्देश आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने उष्मघाताचा धोका सर्वाधिक वाढला आहे. विद्यार्थी उष्माघाताचे बळी ठरू नये याकरीता नागपुरातील सर्व शाळा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार महानगर पालिका आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग घेण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे किंवा ज्या शाळांनी परीक्षांचे आयोजन केले आहे, त्या शाळांना सर्व कार्यक्रम सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना प्राथमिक, माध्यमिक, महापालिका व सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांना दिले आहेत.

Intro:नागपूर शहरात तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.... उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे संपूर्ण शहरच होरपळत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने विविध शासकीय यंत्रणांनी हिट ऍक्शन प्लॅन अंतर्गत उपाय योजना करायला सुरवात केली आहे.....उन्हाची तीव्रता वाढल्यानंतरही नागपुरातील अनेक शाळा अजूनही सुरु आहेत.... आज पासून त्या सर्व शाळा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशही दिले आहेत Body:नागपुरातील सर्वच शाळांची परीक्षा हि मार्च आणि एप्रिल महिन्यातच आटोपली आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा नागपूर विद्यापीठाकडून घेतली जात आहे.....प्रादेशिक हवामान खात्याने पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट राहील असा अंदाज वर्तविल्या नंतर नागपूर जिल्हा प्रशासनाने आज पासून शाळा बंद करण्याचे निर्देश आहे..... उन्हाची दाहकता वाढल्याने उष्मघाताचा धोका सर्वाधिक वाढला आहे.... विदयार्थी उष्मघाताचें बळी ठरू नये या करीता नागपुरातील सर्व शाळा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशही दिले आहेत.... जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार महानगर पालिका आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.....ज्या शाळांनि विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग घेण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे किंवा ज्या शाळांनी परीक्षांचे आयोजन केले आहेत त्या शाळांना सर्व कार्यक्रम सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना प्राथमिक, माध्यमिक, महापालिका व सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.