ETV Bharat / state

अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं सरसंघचालक घेणार 'बौद्धिक' - राज्यात नवीन राजकीय समीकरणे

Sarsanghchalak Mohan Bhagwat विद्यमान सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भाजपाबरोबर आहेत. त्यात सध्या नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. यात आता अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना संघ मुख्यालायत बोलावणं आलं आहे. या भेटीत सरसंघचालक त्यांना काय कानमंत्र देणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Sarsanghchalak Mohan Bhagwat
Sarsanghchalak Mohan Bhagwat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:27 PM IST

मुंबई Sarsanghchalak Mohan Bhagwat - शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना सरसंघचालक मोहन भागवत कानमंत्र देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी यंदा प्रथमच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. उद्या (१९ डिसेंबर) सकाळी ८ वाजता सर्व आमदार आणि खासदार यांना संघ मुख्यालयात हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ज्या आमदारांकडे स्वतःचे वाहन नाही अशा आमदारांसाठी आमदार निवासापासून बसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

काय कानमंत्र देतात याकडे लक्ष - नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात दरवर्षी दिवंगत हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपाचे सर्व आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा प्रथमच भाजपाच्या आमदारांसोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत हे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तिन्ही पक्षांच्या आमदारांना आणि खासदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

बाळासाहेबांसह उद्धव ठाकरेंनी राखले होते अंतर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेनेचे आमदार कधीच संघ मुख्यालयात गेले नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्रं आल्यानंतर सुध्दा शिवसेना आमदार कधीच संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. तसंच दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संघ आणि हिंदुत्वापासून नेहमीच अंतर ठेवलं होतं. कारण संघाची विचारधारा त्यांना कधीच पटली नाही. परंतु आता शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली असल्यानं शिंदे गटाची विचारधारा व अजित पवार गटाची विचारधारा ही संघाच्या विचारधारेशी सहमत आहे का? हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.

शेवटी भाजपाशी हात मिळवणी करूनच शिंदे आणि अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार नागपुरात आहेत. या कारणाने या आमदारांना संघाने आमंत्रित केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी प्रथमच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना आमंत्रित केल्यानं राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात नवीन राजकीय समीकरणे - काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यात बरेच आमदार हे भाजपाच्या चिन्हावर निवडून गेले आहेत. विशेषत: काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपा आणि संघाशी जळवून घेतलं. हे दोन्ही नेते संघ मुख्यालयात सुद्धा गेले. याविषयी चांगलीच चर्चा सुद्धा झाली होती. आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संघ कार्यालयात हजेरी लावणार असल्यानं राज्यात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने उपदेश - येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यात मिशन ४५ टार्गेट ठेवलं असून त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. अशात भाजपासोबत असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अशातच भाजपाची भूमिका ही स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याबरोबर मित्र पक्षांचेही उमेदवार निवडून आणण्यावर जास्त अवलंबून असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत भाजपासोबत शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार, खासदारांना कुठला उपदेश करतात हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचलंत का..

  1. महाराष्ट्र विधानसभेतही गॅलरीत घोषणाबाजी; अध्यक्षांचे चौकशीचे आदेश
  2. कोल्हापूर : सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.