ETV Bharat / state

2024 नंतर सरकार बदलणार, कोणी सत्तेचा अमर पट्टा बांधून आलेला नाही - संजय राऊत - सीबीआय

राजकीय भूमिका घेऊन जर कोणी टीका करत असेल आणि त्यावर एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत असतील तर या लोकांना 'आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला' असा डंका पिटण्याचा अधिकार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. ते आज नागपूर येथे बोलत होते.

sanjay raut
संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 4:04 PM IST

संजय राऊत

नागपूर : संजय राऊत सरकारवर आरोप करत म्हणाले की, "दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटीची स्थापन करायची असेल तर करा. हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल तर द्या, केजीबीकडे द्याचा असेल तर द्या. आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची. आम्ही त्यांना भीक घालत नाही, त्यांना एसआयटी करायची आहे. चौकशी करा लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकामागे एसआयटी लावा, 'राज्यात कायदा सुव्यवस्थेची धूळधाण उडाली याबद्दल कुणी काही बोलू नका' असा सरकारचा कारभार सुरू आहे. 2024 नंतर सरकार बदलणार आहे, कोणी सत्तेचा अमर पट्टा बांधून आलेला नाही, हे टेम्पररी आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.

मागासवर्ग आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर दबाव येत होता, आधी सदस्यांनी राजीनामे दिले आता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा दिला. त्यांनी आठ दिवसांपूर्वी राजीनामा दिला, एवढे दिवस ही बाब का लावपून ठेवली. विशिष्ट अहवाल देण्यासाठी आयोगावर दबाव येत होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा आरोप राऊत यांनी केला.

मुंबई महापालिका ऑडिट : "मुंबई महापालिकेचं ऑडिट होणार आहे तर ते नक्की करा. गेल्या दोन वर्षाचं ऑडिट करा, फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर पुणे पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे या सर्व महानगरपालिकांचं ऑडिट व्हायला पाहिजे. नगर विकास खात्याचं गेल्या दीड वर्षाच्या कारभाराचं आणि व्यवहाराचं ऑडिट करा. कारण महापालिका नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात." असं खासदार संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदींबद्दल राऊत काय म्हणाले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे. त्यांच्यावर केलेली टीका राजकीय आहे. ही वैयक्तिक टीका नाही. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कलम 370 वर बोलताना पंडित नेहरूंवर टीका केली. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणी गुन्हा दाखल करणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा :

  1. "एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा विरोध भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता", संजय राऊतांचा गौप्यस्फोट
  2. संजय राऊतांच्या गाडीवर चप्पल भिरकावली, नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा
  3. ठाकरे गटाचे 'फायरब्रँड' अडचणीत, पंतप्रधानांविरोधात कथित आक्षेपार्ह लेख लिहिल्यानं गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.