नागपूर- २०१९च्या लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी जे आज सत्तेत बसले आहेत, ते काही चुकीचे करतील आणि भारत-पाकिस्तान हल्ला घडवला जाईल, अशी भीती होती. त्यामुळे आम्ही खूप वेळा यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पुलवामामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा असताना तब्बल तीनशे किलो आरडीएक्स कसे पोहोचले, अशा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
खासदार राऊत म्हणाले, की सैन्यदलाचे सुरक्षा जवान पुलवामाच्या रस्त्यावरून कधी जात नाहीत. हवाई दल आणि सरकारने त्यांना विमान का दिले नाही? पुलवामा हल्ला घडवून त्यावर राजकारण करून निवडणुका जिंकण्याची अशी काही योजना होती का? यावर अनेकदा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. मात्र, असे प्रश्न विचारणाऱ्यांना, पाकिस्तानची भाषा बोलणारे देशद्रोही ठरविले जात आहे. त्यावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्य समोर आणले आहे. त्यांनी केलेला गौप्यस्फोट हा पुलवामा बॉम्ब स्फोटापेक्षाही मोठा आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवला जावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. या सर्व घटेनेला जबाबदार असलेल्या मंत्र्याचे कोर्ट मार्शल झाले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
विजय मल्ल्या, नीरव मोदी मोकाट- विजय मल्ल्या याला भारतात आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे विरोधकांना जेलमध्ये टाकले जात आहे. चौकशीसाठी तर सीबीआयचे पथक विशेष जेट विमानाने गेले होते. नीरव मोदीला भारतात आणले जात नाही. काळा पैसा कसा आणण्याबाबतसरकारचे अपयश आहे. नागपूरची एक संस्कृती आहे. सर्वव्यापी समाज आहे. विरोधी पक्षाची सभा होऊ नये म्हणून मोर्चे काढले जात आहे. सत्ताधारी नेते कोर्टात जात आहेत. सर्व अडथळे दूर झाले असून उद्या होणारी वज्रमुठ सभा भव्य आणि यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
तर भाजप 150 पुढे जाणार नाही: राहुल गांधी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटत आहेत. राहुल गांधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. ममता बॅनर्जी यांना ते भेटणार असल्याचे मी ऐकले आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. 2024 पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे. एकास एक उमेदवार दिला तर भाजप 150 आकडा पार करणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा-गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर, व्रजमुठीला भेदण्याकरिता काय आखणार रणनीती?