ETV Bharat / state

Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग विदर्भ, मराठवाड्याची भाग्यरेखा बदलणारा प्रकल्प : एकनाथ शिंदे - CM Uddhav Thackeray

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची ( Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg ) पाहणी केली. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य उजळणार असल्याचा दावा शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ( Minister Eknath Shinde inspects Samrudhi Highway ) केला.

Minister Eknath Shinde inspects Samrudhi Highway
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Apr 22, 2022, 8:42 PM IST

नागपूर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे ( Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg ) लाखो लोकांना रोजगार मिळेल. कृषी समृद्धी केंद्र, प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्याची भाग्यरेखा बदलेल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वाशिम शेलू ते नागपूर महामार्गाचा शिंदे यांनी आढावा ( Minister Eknath Shinde inspects Samrudhi Highway ) घेतला. यावेळी ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

२१० किमी रस्ता वाहुकीसाठी होणार सुरु : देशातील सर्वात मोठा आणि राज्याचा महत्त्वकांक्षी सुपरफास्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या वाशिम शेलू ते शिवमडका दरम्यानचा दोनशे दहा किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. मोठ्या प्रमाणात इंधनाची आणि वेळेची बचत होईल. हा एक मोठा प्रकल्प मार्गी लागणार असल्याने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात कृषी समृद्धी केंद्र, प्रोसेसिंग युनिट तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर या भागातल्या परिस्थितीनुसार उद्योगधंदे निर्माण होतील. तसेच समृद्धी हायवे हा लोकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समृद्धी आणेल. हा गेम चेंजर प्रकल्प असून विदर्भ- मराठवाड्याची भाग्यरेखा बदलणारा हा प्रकल्प असल्याचे मंत्री शिंदे म्हणाले.

समृद्धी महामार्ग विदर्भ, मराठवाड्याची भाग्यरेखा बदलणारा प्रकल्प : एकनाथ शिंदे

रस्ता लोकांसाठी असतो : देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सत्ताकाळात प्रकल्पाची सुरुवात झाली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात पूर्ण होत आहे. आरोप-प्रत्यारोप निरंतर सुरु राहणार. अशामुळे काम पूर्ण होईलच असे नाही. आपण प्रकल्प मार्गी लावत आहोत. कोणाचेही नाव कमी जास्त करायच कारण नाही. बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवण कधी दिलेली नाही. रस्ता हा लोकांसाठी असतो, त्याचा फायदा त्यांना झालाच पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेबांचा पुतळा उभारणार : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आहे. याचा विशेष अभिमान आणि आनंद आहे. बाळासाहेबांच्या नावाप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या जातील. पुतळ्याचा यात समावेश असल्याचे संकेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच लवकरच उर्वरित महामार्गाचे काम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Samruddhi Mahamarg Speed : समृद्धी महामार्ग वेगाचे सर्व रेकॉर्ड तोडणार; 120 किमी प्रतितास राहणार वेग मर्यादा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.