ETV Bharat / state

नागपुरात 'या' महिला क्रिकेटपटूने पकडले चोराला - Nagpur latest news

स्वामी कॉलनीत राहणारी सलोनी आपल्या आईवडिलांसह कारने शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गिट्‌टीखदान परिसरातच राहणाऱ्या आपल्या मामाकडे गेली होती. तेथून कार्यक्रम आटोपून मध्यरात्री दीडच्या सुमारास ती घरी परतली. सलोनी घराच्या बाजूला कार लावत असताना तिला अंधारात चोर दिसला.

Nagpur
सलोणी अलोट
author img

By

Published : Feb 26, 2020, 5:15 PM IST

नागपूर - शहरातील महिला क्रिकेटपटू सलोणी अलोट हिने एका चोराला आपल्या चपळाईने पकडले आहे. त्यानंतर या चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. धनराज पंचेश्‍वर (बालाघाट) असे या चोराचे नाव आहे.

महिला क्रिकेटपटूने पकडले चोराला

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी कॉलनीत राहणारी सलोनी आपल्या आईवडिलांसह कारने शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गिट्‌टीखदान परिसरातच राहणाऱ्या आपल्या मामाकडे गेली होती. तेथून कार्यक्रम आटोपून मध्यरात्री दीडच्या सुमारास ती घरी परतली. सलोनी घराच्या बाजूला कार लावत असताना तिला अंधारात चोर दिसला. त्यावेळी सलोणी चोराजवळ गेली असता, त्याने भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाडसी सलोनीने पाठलाग करत जवळपास 10 मिनिटे चोराला पकडून ठेवले.

दरम्यान, सलोनीच्या आई-वडिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. त्यानंतर चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या झटापटीत सलोनीच्या दोन्ही हातांना जखम झाली आहे.

प्रत्येक मुलीने स्वतःला इतके सक्षम करा की, कुठलेही संकट आले की, लढण्याची ताकत आणि तयारी मुलींमध्ये असली पाहिजे. महिला सुरक्षेबाबतच्या अनेक घटना मन सुन्न करतात. मात्र, मुलींनी कुणाच्याही मदतीवर निर्भर न राहता स्वतः प्रत्येक संकटाचा सामाना करण्यासाठी सक्षम बना, असा संदेश सलोनीने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.