नागपूर - जिल्ह्यातील कामठी येथे एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. दाल ओळी नंबर २ येथील ही घटना असून दुर्गंधी आल्याने हा प्रकार लक्षात आला. कल्पना लवटे( वय 50) आणि पद्मा लवटे (वय 60) अशी मृत महिलांची नावे आहेत.
आठ दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नव्हत्या -
मृत बहिणींची प्रकृती चांगली नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून त्या कुणाच्याही संपर्कात नव्हत्या. नगर परिषदेचा कर्मचारी पावती देण्यासाठी घरी गेला त्यावेळी घरातून दुर्गंधी आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. कामठी पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुगणलयात पाठवून तपास सुरू केला आहे. आज दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे
भूकबळी असण्याची शक्यता -
कल्पना लवटे आणि पद्मा लवटे यांच्या घरातील अन्न-धान्य संपलेले होते. शिवाय त्या दोघीही आजारी असल्याने त्या कुणाला अन्न देखील मागू शकल्या नसाव्यात असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे या दोघीही भूकबळी असण्याची शक्यता आहे.