ETV Bharat / state

जातीय समीकरणांना फाटा देत नितीन गडकरींनी राखला गड, 'ही' आहेत विजयाची कारणे - नागपूर

नागपूरच्या रिंगणात नितीन गडकरी, काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात होते. तर वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे नागपूरांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. मात्र, नागपूरकरांनी जाती धर्माच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्यामुळे जातीय समीकरणे फोल ठरले आहेत.

पराभूत झालेले उमेदवार नाना पटोल आणि विजयी उमेदवार नितीन गडकरी
author img

By

Published : May 24, 2019, 6:39 PM IST

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींना विजय मिळवणे कठीण जाईल, असे बोलले जात होते. मात्र, गडकरींनी जातीय समीकरणांना फाटा देत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभूत केले आहे. गडकरींनी नागपूरचा केलेला कायापालट त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. नागपूरकरांनी जातीचा विचार न करता फक्त गडकरींनी केलेल्या विकासकामांना मत दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात निकालानंतर काय झालं याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. गडकरींचा विजयरथ जातीय समीकरणे रोखून धरतील, अशा शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. याशिवाय मोदी सरकारला अपेक्षित यश न मिळाल्यास पंतप्रधानपदासाठी तडजोडीचा उपाय म्हणून नितीन गडकरी नावाचा पर्याय उपलब्ध असल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून केंद्रातील सर्व शंका-कुशंकांवर विराम लावत गडकरींनी आपला गड राखला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ७ वेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांच्यावर विजय मिळवला होता. गडकरींनी ५ वर्षात केलेले विकास कामे दिसत असल्याने त्यांच्या विजयबद्दल गडकरी फारसे चिंतीत नव्हते. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी त्यांच्याविरोधात आक्रमक प्रचार केला होता. त्यामुळे गडकरी त्यांच्या विजयाबाबद निश्चित नव्हते.

जातीय समीकरणसुद्धा गडकरींच्या बाजूनेच

नागपूर लोकसभा निडणूक ही राजकीय दृष्टीने भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. नागपूरला संघभूमी तसेच दीक्षाभूमी म्हणून ओळखतात. मात्र, जाती, धर्म आणि पंथाच्या राजकारणाला नागपूरकर कधीही बळी पडला नाही. नागपुरात दलित आणि मुस्लिम मतांचा आकडा मोठा आहे. तसेच ओबीसी मतेही अधिक आहेत. त्यामुळे याठिकाणी जातीय समीकरणाला तेवढच महत्व होते. नागपूरच्या रिंगणात नितीन गडकरी, काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात होते. तर वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे नागपूरांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. मात्र, नागपूरकरांनी जाती धर्माच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्यामुळे जातीय समीकरणे फोल ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांची विधानसभेत पुनरावृत्ती?
नागपूर लोकसभा मतदार संघात शहरातील ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. या सहाही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीदेखील भाजपच्याच ताब्यात आहे. एवढेच नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचेच भूमिपुत्र आहेत. त्यामुळे नागपूरकर भाजपच्या दिशेने वळलेले पाहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश संचारला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका एकतर्फी जिंकू, असा विश्वासही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:नागपूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण, निकालाचे दूरगामी परिणाम याचा आढावा Body:नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले होते,कारण नागपुरातून नितीन गडकरींना विजय मिळवणे कठीण जाईल,किंबहुना गडकरी नागपुरातून पराभूत होतील अश्या प्रकारच्या चर्चानी जोर धरला होता.... विकासपुरुष अशी प्रतिमा असलेल्या गडकरींचा विजय रथ जातीय समीकरणे रोखून धरतील अश्या देखील शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या,देशाचे सर्वात प्रभावी आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ख्याती मिळवलेले गडकरी पराभूत होण्याची स्थिती निर्माण झाली असेल तर केंद्रातील भाजपचे सरकार देखील धोक्यात येईल अशी मांडणी विश्लेषक करत असल्याने यावेळी नागपूर देशाच्या राजकारणात केंद्र स्थानी आले होते...... या शिवाय मोदी सरकारला अपेक्षित यश न मिळाल्यास तडजोडीचा उपाय म्हणून सुद्धा नितीन गडकरी नावाचा पर्याय उपलब्ध आसल्याने सुद्धा नागपूरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.... मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालातून केंद्रातील सर्व शंका-कुशंकांवर विराम लागला असला तरी नागपुरातील नितीन गडकरींचा विजय सर्वांगीण दृष्ट्या ऐतिहासिकच म्हणावा लागेल..... २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ७ वेळा खासदार राहिलेल्या विलास मुत्तेमवारांवर विजय मिळवला होता.... २०१४ साली असलेली मादी लाट या वेळी दिसत नव्ह्ती तरी देखील नागपुरात नितीन गडकरी यांचे नाव पुरेसे होते..... गडकरींनी ५ वर्षात केलेले विकास काम जमीन पातळीवर दिसत असल्याने सुद्धा नितीन गडकरी फारसे चिंतीत नव्हते पण निश्चित देखील नव्हते..... काँग्रेस चे उमेदवार नाना पटोलेंनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे गडकरींना पहिल्या टप्यातील निवडणूक होई पर्यंत बाहेर राज्यात प्रचारासाठी फिरकता सुद्धा आले नाही..
जातीय समीकरण सुद्धा गडकरींच्या बाजूनेच
नागपूर शहर देशाच्या मध्यस्थानी वसलेले आहे,त्याच प्रमाणे नागपूर शहराने देशाच्या राजकारणाच्या केंद्र स्थानी आपली ओळख निर्माण केली आहे....नागपूरातुनच केंद्रसरकारला निर्देशित केले जात असल्याचा आरोप वेळोवेळी होत आल्यानेच देशाच्या राजकारणात नागपूर शहराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे....नागपूर लोकसभा हि राजकीय दृष्टीने भाजप साठी प्रतिष्ठेची झाली होती ...... नागपूरला संघ भूमी ,तर कोणी दीक्षाभूमी म्हणून ओळखतात,मात्र नागपूर असं शहर आहे इथे जाती,धर्म आणि पंथाच्या राजकारणाला नागपूरकर कधीही भुलला (बळी पडला )नाही..... याही निवडणुकीत नागपूरकरांनी जाती धर्माच्या राजकारणा पेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे.....नागपुरात दलित आणि मुस्लिम मतांचा आकडा सुद्धा मोठा आहे तर ओबीसी सुद्धा कमी नाही त्यामुळे इथे जातीय समीकरणाला सुद्धा तेवढाच महत्व आहे ...नागपूरच्या रिंगणात नितीन गडकरी सह काँग्रेस कडून नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे ... विदर्भवादी प्रणित विदर्भ विकास महामंच आणि वंचित आघाडी कडून सागर डबरासे आणि बीएसपी ने मोहम्मद जमाल याना मैदानात उठल्याने नागपूर लोकसभा मतदार संघातील मतदारांकडे मोठा चॉईस उपलब्ध झाला होता खरा पण नागपूरकर जनतेने विकासाच्या बाजेने केलेल्या मतदानामुळे जातीय समीकरणांची हवा निघाली आहे ..
लोकसभा निवडणुकीच्या निकालांची पुनरावृत्ती विधानसभेत होणार
नागपूर लोकसभा मतदार संघात शहरातील ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो..... सर्वच्या सर्व सहाही विधानसभेच्या जागांवर भाजपचा निर्विवाद कब्जा आहे...... शिवाय महानगर पालिका,जिल्हापरिषद,पंचायत समिती देखील भाजपच्याच ताब्यात असल्याने नागपूर हे भाजपचा बालेकिल्ला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.... एवढाच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूरचेच भूमिपुत्र असल्याने नागपूरकर भाजपच्या दिशेने वाळलेला आहे..... लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश संचारला असून आगामी विधानसभा निवडणुका सुद्धा एकतर्फी जिंकू असा दम भाजप चे कार्यकर्ते भरू लागले आहेत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.