ETV Bharat / state

जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध - श्रीधर गाडगे - Shridhar Gadge

Rashtriya Swayamsevak Sangh : बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वातील सरकारनं जातीय जनगणना केल्यानं जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण अजूनच चिघळलं आहे. असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याचं स्पष्ट केलंय.

Rashtriya Swayamsevak Sangh opposition to caste wise census said Shridhar Gadge
जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध- श्रीधर गाडगे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 12:33 PM IST

Updated : Dec 19, 2023, 1:14 PM IST

जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध- श्रीधर गाडगे

नागपूर Rashtriya Swayamsevak Sangh : मागास जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी बिहार राज्याने राज्यांतर्गत जातनिहाय जनगणना केली आहे. बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. तसंच आरक्षणावर तोडगा काढायचा असेल तर जातीनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचंही राजकीय नेत्यांकडून बोललं जातंय. असं असतानाच आता जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीधर गाडगे : जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याची भूमिका आज (19 डिसेंबर) विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी विषद केली आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास कमी संख्या असलेल्या समाजाच्या मनात न्यूनगंड किंवा जास्त संख्येनं असलेल्या समाजाच्या मनात वेगळी भावना निर्माण होईल असा तर्क त्यांनी यावेळी दिला. जातीनिहाय जनगणना देशाला काय फायदा आहे असा सवाल देखील त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना केलाय. ते म्हणाले की, माझ्या मते जातीनिहाय जनगणनेचा काहीच फायदा नाही. त्यामुळं जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नाही. तसंच ज्यांना वाटतं की जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे, त्यांनी याचा काय फायदा होईल हे सांगावं, असंही ते म्हणाले.

न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता : पुढं ते म्हणाले की, जातीय जनगणनेमुळं अनेकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. याचं कारण म्हणजे जर जातीनिहाय जनगणना झाली, तर प्रत्येकाला कळेल की आपल्या समाजात किती आणि दुसऱ्या समाजात किती संख्या आहे. यामध्ये ज्यांची संख्या कमी आहे, त्या लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं ते दबून राहण्याची शक्यता आहे. तसंच ज्यांच्या समाजाची संख्या जास्त आहे ते लोक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.

या प्रकरणात राजकीय पक्षांचे आपआपले हेतू आहेत. त्यामुळंच मी म्हणतो, जे लोक म्हणताय की जातीनिहाय जनगणना करा, अशांनी अगोदर त्यामागचे फायदे काय आहेत ते सांगावं. तसंच याचा देशाला काय फायदा याची देखील माहिती त्यांनी द्यावी, असंही गाडगे यांनी म्हटलंय. शिंदे गटाचे आमदार आणि भाजपाच्या आमदारांनी आज संघ मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर गाडगे बोलत होते. यावेळी अजित पवार गटाचे आमदार संघ मुख्यालयामध्ये भेटीसाठी आले नव्हते. तसंच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संघ मुख्यालयामध्ये आलेले नव्हते.

संघाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दांडी : महायुतीतील भाजपा व शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. मात्र, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर होते. त्यामुळं चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संघाच्या मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहतील का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही या कार्यक्रमाला दांडी मारली. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं उपराजधानी नागपुरात येणाऱ्या भाजपा आमदारांसह सहयोगी पक्षाच्या आमदारांसाठी मार्गदर्शन वर्ग भरवला जातो. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी आमदारांचं पंचसूत्री मार्गदर्शन केलं.

हेही वाचा -

  1. Cast Wise Census : बिहारप्रमाणेच राजस्थानमध्येही जातीनिहाय सर्व्हे; भाजपाशासित राज्यात का नाही?
  2. Kapil Patil : जातीनिहाय जनगणना करण्यासाठी आमदार कपिल पाटील आक्रमक; पाहा काय म्हणाले?
  3. State Backward Classes Commission Meeting : 'जातीनिहाय जनगणना होऊन ती आकडेवारी आल्याशिवाय अहवाल शासनाला देणार नाही'

Last Updated : Dec 19, 2023, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.