ETV Bharat / state

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन रद्द

author img

By

Published : Jun 3, 2021, 7:39 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग बौद्धिक, शारीरिक, सामाजिक कार्य, घोष, संघाच्या जेष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन यामध्ये होत असते. संघ तृतीय वर्ग शिक्षा प्राप्त केल्यानंतरच संघामध्ये प्रचारक होण्याची परवानगी मिळते. संघ शिक्षा वर्गाच्या अखेरच्या दिवशी सरसंघचालक मार्गदर्शन करतात. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी संघ तृतीय वर्ष शिक्षा वर्ग प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

आरएसएस
आरएसएस

नागपूर - देशात कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वर्षी होणारे तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन रद्द केले आहे. गेल्यावर्षी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस असल्यामुळे संघाने तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन रद्द केले, त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाचा सलग दुसऱ्या वर्षी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन रद्द झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये स्वयंसेवकांसाठी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांच्या ऑनलाइन शाखा आणि प्रत्यक्ष सेवाकार्य सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संघ तृतीय वर्ग शिक्षा वर्गात देशातील संघासाठी पूर्ण वेळ समर्पित कार्य करणारे स्वयंसेवक सहभागी होत असतात, त्यांची विशिष्ट पद्धतीने निवड केली जाते. साधारण ९०० ते १ हजार स्वयंसेवक देशातील कानाकोपऱ्यातुन या शिक्षा वर्गाला नागपुरात येत असतात. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता स्वयंसेवकांना नागपुरला पोहचणे शक्य होणार नाही. त्यामुळे तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय संघाला घ्यावा लागला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन रद्द

तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची माहिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग बौद्धिक, शारीरिक, सामाजिक कार्य, घोष, संघाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन यामध्ये होत असते. संघ तृतीय वर्ग शिक्षा प्राप्त केल्यानंतरच संघामध्ये प्रचारक होण्याची परवानगी मिळते. संघ शिक्षा वर्गाच्या अखेरच्या दिवशी सरसंघचालक मार्गदर्शन करतात. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी संघ तृतीय वर्ष शिक्षा वर्ग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. संघाचे प्रथम, द्वितीय प्रशिक्षण वर्ग देशाच्या विविध भागांमध्ये होत असतात. परंतु संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग दरवर्षी नागपुरातील रेशीमबाग परिसरात होत असतो. रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात हे प्रशिक्षण वर्ग होत असतात. 25 दिवसांचे हे प्रशिक्षण वर्ग असते. परंतु गेल्यावर्षी आणि यंदा सुद्धा कोरोनामुळे हा संघ शिक्षा वर्ग रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये सेवकांसाठी प्राथमिक शिक्षा वर्ग प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष असे प्रशिक्षणातील टप्पे समजले जातात. डॉक्टर केशव हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यानंतर साधारण 1926,1927पासून संघाच्या नियमित शाखा लागण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा-Maharashtra unlock : राज्यातील 18 जिल्हे पूर्णपणे 'अनलॉक', तर मुंबई लोकलचा निर्णय लवकरच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.