ETV Bharat / state

Rape on two minor girls : नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; आजोबाने नातीवर तर युवकाने शेजारच्या मुलीवर केला अत्याचार - आजोबाचे दुष्कृत्य

नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. जरीपटका आणि कपिल नगर या भागांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ( Rape on two minor girls ) झाला. एका घटनेत तर 62 वर्षीय आजोबानेच 13 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे. दुसऱ्या घटनेत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले.

कपीलनगर पोलिस ठाणे
कपीलनगर पोलिस ठाणे
author img

By

Published : Jun 7, 2022, 10:35 AM IST

Updated : Jun 7, 2022, 11:11 AM IST

नागपूर - शहरातील जरीपटका आणि कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पहिली घटना ही नात्याला काळिमा फासणारी आहे. ६२ वर्षीय आजोबांनी १३ वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत २४ वर्षीय तरुणाने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही गुन्हातील आरोपींना अटक केली आहे.

घराशेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार - पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपी निलेश लिंबाडे नामक आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. आरोपी निलेशने हळूहळू पीडित मुलीला विविध प्रकारचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली केली. दोन दिवसांपूर्वी आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावले होते. घर कुणीही नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. घटनेची वाच्यता कुठे केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीचे आईवडील घरी येताच तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी जरीपटका पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे.

अत्याचारी आजोबा - दुसरी घटना ही कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल महिन्यात घडली आहे. आरोपीची मुलगी बाळंतपणासाठी त्यांच्या घरी राहण्यास अली होती. या दरम्यान त्यांची १३ वर्षीय नात आजोबांच्या जवळ झोपायची. त्यावेळी आरोपी मुलीचा गैरफायदा घेत असल्याचे पीडित मुलीच्या आईच्या निदर्शनास आले. या संदर्भात त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितले असता सर्वांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. आपल्या घराची बदनामी होईल या भीतीने ती महिला शांत राहिली. मात्र, आजोबांनी स्वतःच्या नातीवर अत्याचार केल्याने ती अस्वस्थ झाली. अखेर मुलीच्या आईने कपिल नगर पोलिस ठाण्यात जाऊन वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा - Todays Vegetables Prices : मिरची, शेंगा, गवारचे भाव वाढले.. वाटाणा घसरला.. वाचा आजचे भाजीपाल्याचे दर

Last Updated : Jun 7, 2022, 11:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.