नागपूर - सध्या सर्वत्र परतीच्या पावसाला सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे. नागपुरातही आज सकाळपासूनच सरीवर सरी बरसत आहे. मात्र दुपारनंतर पावसाने जोर वाढवत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. शिवाय जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचेही पहायला मिळाले.
गेल्या काही दिवसापासून नागपुरात पावसाच्या सरीवर सरी बसरत आहे. त्याचबरोबर वातावरणात प्रचंड उकाडादेखील निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच आज पावसाच्या जोरदार आगमनामुळे या उकाड्यापासून त्यांची सुटका झाली आहे.
नागपुरात कित्येक दिवसापासून प्रत्येक दोन दिवसाआड पावसाच्या सरी बसरत आहे. त्यामुळे वातावरणातही कमालीचा बदल दिसून येत आहे. शिवाय अधून-मधून बरसणाऱ्या सरींमुळे नागरिकांची तारंबळदेखील उडत असल्याचे चित्र आहे. असे असले, तरी जोरदार बसणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. परंतु याच परतीच्या पावसामुळे आता आरोग्य विषयक समस्यांनादेखील सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अधून-मधून बसणाऱ्या पावसाच्या सरी मनाला दिलास तर देत आहेत. मात्र दुसरीकडे आरोग्यविषयक समस्यादेखील या पावसामुळे उद्भवत आहे.