ETV Bharat / state

जनआंदोलनातर्फे नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती, राज्यकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप

author img

By

Published : Aug 27, 2019, 9:31 AM IST

नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तत्कालीन आणि वर्तमान सरकारांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली. तसेच आंदोलकांनी 'ईव्हीएम हटाओ देश बचाओ'च्या घोषणा दिल्या.

जनआंदोलनातर्फे नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती, राज्यकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप

नागपूर - जनआंदोलनाच्यावतीने २३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात जनजागृती केल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ईव्हीएमचा दुरुपयोग करून राज्यकर्त्यांनी देशाची लोकशाहीच धोक्यात आणली असल्याची टीका करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे केले होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. मात्र, पुन्हा राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी, सोनिया गांधी यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधात आंदोलन उभारणार असल्याची भूमिका घेतली. तसेच इतर पक्षदेखील ईव्हीएमविरोधात लढा उभारत आहेत.

शहरात ईव्हीएमविरोधात घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तत्कालीन आणि वर्तमान सरकारांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली आली. तसेच आंदोलकांनी 'ईव्हीएम हटाओ देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. प्रत्येक शासनकर्त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच ईव्हीएमचा दुरुपयोग केलेला आहे. ही जनतेची स्पष्ट दिशाभूल असल्याने केंद्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे जनआंदोलनाचे नेते म्हणाले. येणारी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात 21 सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडण्याचा ईशारा देखील ईव्हीएमविरोधकांनी दिला आहे.

Intro:ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाच्या वतीने 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम राबवली जात आहे...ईव्हीएम विरोधात नागपूर येथे जनजागृती केल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये आंदोलकांनी ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या घोषणा दिल्या...ईव्हीएम चा दुरुपयोग करून राज्यकर्त्यांनी देशाची लोकशाहीच धोक्यात आणली असल्याची टीका केली....2019 मध्ये ईव्हीएम मुळे निवडून आलेलं केंद्रातील सरकार असंवैधानिक असल्याचा आरोप केला आहेBody:लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी ईव्हीएम विरोधात रान उठवले होते,त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली आहे...लोकसभा निवडणूकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यातील राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्यावर मूठ बांधण्याच्या प्रयत्ननात आहेत,मात्र आवाज बुलंद करणाऱ्या नेत्यांच्या मागे चौकाशींचे फेरे लागले असल्याने पुन्हा हा मुद्दा मागे पडणार असे वाटत असताना ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाच्या वतीने 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे...सध्या विदर्भाच्या अनेक शहरात जनजागृती केल्या नंतर नागपूर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये ईव्हीएम वरून तत्कालीन आणि वर्तमान सरकारांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली आली....प्रत्येक शासनकर्त्यांनी केवळ स्वतःच्या फायदया करिताच ईव्हीएम चा दुरुपयोग केलेला आहे,ही जनतेची स्पष्ठ दिशाभूल असल्याने केंद्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे म्हंटले आहे...येणारी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपर वर घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे...या संदर्भात 21 सप्टेंबर ला देशव्यापी आंदोलन छेडण्याचा तयारी ईव्हीएम विरोधकांनी केली आहे

बाईट-रवी बिलाने -
बाईट- फिरोज मिठीबोरवाला -
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.