नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानगरपालिका हद्दीतील तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनी केलेल्या सहकार्याची प्रशासनाने विशेष नोंद घेतली आहे. संभाव्य तिसर्या लाटेमध्येही आपल्या मदतीची प्रशासनाला अपेक्षा असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन, ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकार्यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
पालकमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी या काळात दिलेल्या सेवेसाठी प्रशासनातर्फे आभार मानले. या काळात अनेक रुग्णालयांची सेवा भाव जपत रूग्णसेवा केली. याची माहिती मनपा गोळा करावी. तसेच उपचारासंदर्भात काही हॉस्पिटलबाबत तक्रारी सुद्धा पुढे आल्या आहेत. या सर्व हॉस्पिटल मधील रुग्णसेवेची निश्चित माहिती, सांख्यिकी मनपाकडे असणे आवश्यक आहे. यात भविष्यातील धोरण ठरवताना प्रशासन व वैद्यकीय क्षेत्राला मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'आधी विद्यार्थी आणि शिक्षकांना लस द्या, नंतच परीक्षा घ्या'
आरोग्य क्षेत्रातील काम मोलाचे पण मूठभर -
कोरोना काळामध्ये वैद्यकीय यंत्रणेचे महत्त्व ठळकपणे पुढे आले आहे. मात्र, यात यंत्रणेची कार्यप्रणाली, पारदर्शकता, जबाबदारी बाबतही सर्वसामान्यांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ही महामारी सर्वच दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. समाज जेव्हा संकटात असतो त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राकडून नेहमीच सकारात्मक मदत होताना दिसून आली आहे. मात्र, अन्य क्षेत्राप्रमाणे या आरोय क्षेत्रातील काही मुठभर बेजबाबदार लोकांमुळे आदराचे स्थान असलेल्या या क्षेत्राला गालबोट लागणार नाही याकडेही आरोग्य संघटनांनी जागरूकतेने लक्ष द्यावे, असा सल्लाही यावेळी पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय देवतळे, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे सचिव आलोक उंबरे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - गोल्डमॅन रमेश वांजळेंच्या २ मेहुण्यांचा कोरोनाने १० तासांच्या अंतराने मृत्यू