ETV Bharat / state

'राष्ट्रवादी हा सरकारमधील सर्वात मोठा लाभार्थी पक्ष; पदवीधर निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण बदलेल' - प्रवीण दरेकर बातमी

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती. मात्र, तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्याने पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर हे सरकार कोसळणार असल्याचे भाकितदेखील त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Nov 25, 2020, 9:14 PM IST

नागपूर - राज्यात एक डिसेंबरला होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर नागपुरात पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी हे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्याप्रकारे यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, तो केवळ आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे दरेकर म्हणाले आहेत. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती. मात्र, तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्याने पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर हे सरकार कोसळणार असल्याचे भाकितदेखील त्यांनी व्यक्त केले आहे.

ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे अतिशय महत्त्वाची असणार आहे. या निवडणुकीचे निकाल उद्याचा महाराष्ट्र घडविणारे ठरणार असल्याचे दरेकर म्हणाले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या काळात विदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विकास केला. मात्र, त्यानंतर अनैसर्गिक सरकार राज्यात आल्याने विकासाची कामे ठप्प झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे सरकार समाधान देऊ शकले नाही. विकास कामे ठप्प आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भांतदेखील या सरकारने काही केले नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकीकडे वीज बिलामध्ये सवलत देण्याच्या बाबत ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वतःचीच घोषणा फिरवल्याने जनतेची घोर निराशा झाली असल्याचे ते म्हणाले.

हे महाविकास आघाडी सरकार भकास सरकार -

गेल्यावर्षी राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपा आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असला तरी तीन पक्षात एकवाक्यता कधीही दिसून आली नाही. उलट हे सरकार कायम गोंधळात पडलेल्या अवस्थेतच दिसून आल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसला या सरकारमधे महत्त्व नाही म्हणून त्यांना डावलले जात असल्याचेदेखील ते म्हणाले आहेत.

भाजपाकडून सुरू असलेल्या आंदोलनांचा सरकारला धाक -

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरा अशी मागणी केली होती. भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन हे कोरोनाला पोषक असल्याचे ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवरच आरोपांची सरबत्ती केली आहे. कोरोनाच्या निमित्ताने राज्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते सोडवणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जमत नसल्याने ते भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवरा म्हणू लागले आहेत. आमच्या पंतप्रधानांना चांगलं ठाऊक आहे की जनतेला सुरू असलेल्या त्रासापोटी भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजपा कटिबद्ध -

भाजपा शंभर टक्के मराठा आरक्षणासोबत उभी आहे. नोकर भरती प्रक्रियेतही मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळायला हवा. परंतु दुर्दैवाने या सरकारला मराठा समाजाला न्याय घ्यायचाच नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकारला मराठा समाजासोबत देणे घेणे नाही. यांना संवेदना नसल्याचेही ते म्हणाले. धनगर आरक्षण हे तांत्रिक बाजूत अडकलेले असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी भरीव तरतूद केल्याचा दावा दरेकर यांनी केला.

संजय राऊतांनी ईडीकडे आमचे नाव दिले तरी कधीही तयार -

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत शंभराहून अधिक नेत्यांची नाव ईडीकडे देणार असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी उद्याच ती नावांची यादी ईडीकडे द्यावी. आम्ही चौकशीसाठी तयार आल्याचा दावा केला आहे. ईडीची चौकशी ही संवैधानिक तत्त्वानुसारच होत असते. त्याचा भाजपाशी काहीच संबंध नसल्याचे ते म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.